Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्या शंभरच्या खाली, आज 22 नवे रूग्ण

राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात आज (बुधवारी) दिवसभरात 22 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 20 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या शंभरहून कमी झाली असून, सध्याच्या घडीला 81 अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 635 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 541 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 758 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

देशात 21,607 सक्रिय कोरोना रूग्णांवर

भारतात सध्याच्या घडीला 21,607 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत 830 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 1,771 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.77 टक्के एवढा आहे. देशात आजवर 219.57 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यापैकी, 95.01 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर, 22.04 कोटी नागरिकांनी सुरक्षात्मक डोस घेतले आहेत. (Covid-19 Cases in India)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT