While unveiling the nameplate, Deputy CM Babu Kavalekar and other ministers and dignitaries, in Pernem, Goa
While unveiling the nameplate, Deputy CM Babu Kavalekar and other ministers and dignitaries, in Pernem, Goa Nivrutti Shirodkar / Dainik Gomantak
गोवा

Goa: पेडणे नगर नियोजन खात्याचे नव्या जागेत स्थलांतर

Nivrutti Shirodkar

Pernem: शेती जमीन टिकवून ठेवण्याची गरज असून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोवा प्रदेशाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी भविष्याचा विचार करून योग्य असे नियोजन करण्याची जबाबदारी शहर आणि नगर नियोजन खात्याची आहे(Town Planning Department). अधिकारी प्रामाणिकपणे हे काम करतील, असा विश्वास आहे. हे खाते लोकांच्या अपेक्षा वाढवते. काही चुकत असल्यास दाखवून द्यावे. जेणेकरून चुकीत सुधार करणे शक्य होईल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबु कवळेकर (Babu Kavlekar) यांनी आज पेडणे येथे केले. (Goa)

Deputy Chief Minister and others during the inauguration, Pernem, Goa.

पेडणे येथे खासगी जागेत असलेले शहर आणि नगर नियोजन खात्याचे विभागिय कार्यालय पेडणे येथील कदंब महामंडळाच्या बस स्थानकावर स्वतंत्र जागेत स्थलांतर केले आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबु आजगावकर (MLA & Deputy CM Babu Ajgaokar), मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Soopate), पेडणे नगर पालिकेच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कशाळकर, मनोहर धारगळकर व खात्याचे वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कृषीमंत्री या नात्याने बोलताना उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक आहेत. शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा लोकांना यंत्रे खरेदीसाठी राज्य सरकारने सबसिडी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे. याचा लाभ सर्वांनी घेऊन गोवा राज्यात हरीत क्रांती वाढवावी. सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे.

सुरूवातीला उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण केले. त्यानंतर फित कापून आणि पारंपरिक समई प्रज्वलित करून कार्यालयाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे म्हणाले राज्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही शहर आणि नगर नियोजन खात्याची फार मोठी जबाबदारी आहे. या खात्याचे अधिकारी हि जबाबदारी विसरले आहेत. पर्यटक म्हणून गोव्यात येणाऱ्या लोकांना समुद्र किनारी पार्किंगसाठी जागा ठेवली नाही. काही गावात स्मशानभूमी देखील राखून ठेवली नाही. परप्रांतीयांना परवाना देताना ज्या जागेत स्मशानभूमी सारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्या जागेवर या खात्याने मान्यता देऊ नये.

स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यावेळी बोलताना म्हणाले शहर आणि नगर नियोजन म्हणजे पिडीए लोकांसाठी पीडा आहे असे वाटते. पेडणे मतदारसंघात मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध. होणार आहे. तसेच हा मतदारसंघ सर्व सोईनीयुक्त असा एक नंबरचा मतदार संघ बनणार आहे. पेडणे मतदारसंघात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळामुळे शहरीकरण होणार आहे. अशावेळी नियोजन महत्त्वाचे आहे. मतदार संघातील प्रकल्पांमुळे बेकारीचा प्रश्न याच मतदारसंघातून सुटणार आहे. पुढील एका महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा मैदानाची पायाभरणी केली जाईल. अधिकार्यांनी लोकांसाठी कामात सुटसुटीतपणा आणावा. असे शेवटी बाबु आजगावकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन विजय भंडारी यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadev Betting Scam: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक

Shiroda SSC Result 2024 : ‘ब्रह्मदुर्गा’ चा निकाल यंदाही १०० टक्के

Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राच्या आधारावर FIR रद्द होणार नाही, पती-पत्नीमधील वादात HC चा निर्णय

SCROLL FOR NEXT