Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Goa Rain: उत्तर बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत चक्रीय वारे (cyclonic circulation) निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Sameer Amunekar

पणजी: उत्तर बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत चक्रीय वारे (cyclonic circulation) निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हवामानीय स्थितीचा परिणाम म्हणून गोवा राज्यात २८ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा इशारा गोवा वेधशाळेने दिला आहे.

त्यामुळे आज गुरुवार, २४ जुलै रोजी गोव्यात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत गोवा राज्यात सरासरी ३.४१ इंच पावसाची नोंद झाली असून यामुळे राज्यातील एकूण पावसाची पातळी ७०.४८ इंचांवर पोहोचली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी अधिक आहे, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस (गेल्या २४ तासांत):

  • दाबोळी – ४.५१ इंच (सर्वाधिक)

  • मुरगाव – ४.२२ इंच

  • पणजी – ४.१२ इंच

  • जुने गोवा – ३.८७ इंच

  • काणकोण – ३.७७ इंच

  • फोंडा – ३.६६ इंच

  • मडगाव – ३.२४ इंच

  • म्हापसा – २.९५ इंच

  • धारबांदोडा – २.६१ इंच

  • सांखळी – २.५८ इंच

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

विजेचा धोका, पुराचे संभाव्य प्रमाण, झाडे किंवा वीज तारांच्या संपर्कात येणे टाळावे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT