Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: काळजी घ्या! गोव्यात 10 नव्या कोरोना बाधितांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या वाढली

मागील 24 तासांत 222 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

Pramod Yadav

Goa Corona Update: देशात विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत गोव्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मागील 24 तासांत 222 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

गोव्यात काही दिवसांपूर्वी जेएन 01 व्हेरिएंटचे 19 रुग्ण आढळून आले होते. केरळनंतर गोव्यात आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, सर्व रुग्ण ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले होते.

दरम्यान, राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडील 32 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98.46 टक्के एवढा आहे.

देशातही कोरोना पुन्हा वाढता शिरकाव

केंद्रीय आरोग्य विभागाने पाहटे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 ची 752 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. शुक्रवारच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.

21 मे 2023 नंतर प्रथमच देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT