Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: पाऊस पूर्ण कमी होणारच नाही? पूर्वेकडील वादळाचा परिणाम गोव्यावरती जाणवणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: यावर्षी गोव्यातील पाऊस वेगवेगळ्या विक्रमांकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी जून महिन्यापासून ते आजअखेर (सप्टेंबर) १६०.४६ इंच पावसाची नोंद झालेली आहे. १९६१ मध्ये सप्टेंबरपर्यंत जवळपास १६० इंच इतक्या पावसाची नोंद झाली होती. २०२० साली १६२ इंच पाऊस राज्यामध्ये झाला होता.

यावर्षी वाळपईमध्ये पावसाने आताच द्विशतक गाठले आहे. या परिसरात २०८ इंच पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल सांगे परिसरात १९९ इंच पाऊस झाला आहे. उद्या(सोमवार)पर्यंत कदाचित सांगे परिसरातही द्विशतक पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सगळ्यात कमी पावसाची नोंद (१२५ इंच) झाली ती दाबोळी पर्जन्यमान केंद्राच्या परिसरात.

वेधशाळेने ग्रीन अलर्ट दिला असला तरी तो हवामान बदलानंतर बदलला जाऊ शकतो. यापूर्वी ऑरेंज अलर्ट दिलेला असतानाही पाऊस पडत राहिला आणि नंतर वेधशाळेने रेड अलर्ट देऊन शाळांना सुट्टी दिली होती.

रमेश कुमार यांचा अंदाज खरा!

सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर्वेकडे वादळाने दिलेल्या तडाख्याचे परिणाम नजीकच्या काळात पश्‍चिम घाट परिसरात जाणवण्याची शक्यता अभ्यासकांनी नाकारली नाही. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी शास्त्रज्ञ रमेश कुमार यांनी ‘गोमन्तक’ला चार महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पाऊस पुढे कमी न होता तो कमी-जास्त प्रमाणात होत राहील, असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोंडा आयडी रुग्णालयात आरोग्य सुविधांची वणवा; सावंत सरकार इव्हेंटमध्ये दंग! काँग्रेसचा घणाघात

जुलूसवर कायमच्या बंदीची मागणी; गोव्यात हिंदू संघटनेच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक, म्हापशात तणाव

Goa Congress: गोवा काँग्रेसमधली गटबाजी संपली? चोडणकरांची पाटकर, युरींबाबत स्तुतिसुमने

'या' देशात पोलिस चक्क रेड्यावरुन घालतात गस्त; कारण जाणून तुम्हीही म्हणाल...

World 9 Most Affordable Destinations: स्वस्तात फिरा 'ही' जगातील 9 शहरं; भारतातील 'हे' शहर आहे टॉपवर

SCROLL FOR NEXT