Open Category Students Dainik Gomantak
गोवा

Open Category Students: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांत गोवा तिसरा, 76 टक्के विद्यार्थ्यांचा समावेश; 'युडीआयएसई प्लस' अहवालातून स्पष्ट

UDISE Plus Report 2025 2026: शाळांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत गोव्याचा देशात तिसरा क्रमांक लागला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: शाळांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत गोव्याचा देशात तिसरा क्रमांक लागला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ७८ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश खुल्या प्रवर्गात होत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या २०२५-२६ च्या ‘युडीआयएसई प्लस’ अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावर ‘युडीआयएसई प्लस’मध्ये नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी २७.५ टक्के विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील, १७.७ टक्के अनुसूचित जाती (एससी), १० टक्के अनुसूचित जमाती (एसटी) आणि ४४.९ टक्के विद्यार्थी इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील आहेत.

मात्र, गोव्यातील चित्र यापेक्षा वेगळे आहे. राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७८ टक्के विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील १२ टक्के, एसटी प्रवर्गातील ८ टक्के आणि एससी प्रवर्गातील केवळ २ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लक्षद्वीप, मिझोराम, मेघालय आणि लडाख या राज्यांमध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील शाळांमधील सरासरी ९० ते ९५ टक्के विद्यार्थी एसटी प्रवर्गातील असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

SCROLL FOR NEXT