Porvorim Ground Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket: लाल माती खेळपट्टीची उत्सुकता; गोवा व चंडीगडच्या कामगिरीकडे लक्ष

Ranji Trophy Cricket: पर्वरीत आजपासून गोवा विरुद्ध चंडीगड लढत

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket: पर्वरीतील जीसीए क्रिकेट अकादमी मैदानावर 2010 पासून 34 रणजी करंडक स्पर्धेतील सामने झालेले आहेत, ते सर्व काळ्या मातीच्या पारंपरिक खेळपट्टीवर झाले. आता शुक्रवारपासून (ता.12) प्रथमच या मैदानावरील लाल मातीच्या नव्या कोऱ्या खेळपट्टीवरील चार दिवसीय सामना खेळला जाणार असून उत्सुकता वाढली आहे.

गोवा व चंडीगड यांच्यातील एलिट क गट सामना पर्वरीत खेळला जाईल. त्यावेळी नव्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या कामगिरीकडे लक्ष राहील. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आगरतळा येथे त्रिपुराने गोव्याला के. व्ही. सिद्धार्थ याच्या दुसऱ्या डावातील झुंजार नाबाद 151 धावानंतरही 237 धावांनी हरविले होते.

चंडीगडची घरच्या मैदानावर रेल्वे संघाविरुद्ध दयनीय स्थिती झाली. पहिल्या डावात ९६ धावांत गारद झाल्यानंतर चंडीगडची २१७ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात ५ बाद ९० अशी घसरगुंडी उडाली होती.

खराब हवामानामुळे बहुतांश षटकांचा खेळ होऊ शकला नाही आणि त्यामुळे चंडीगडची पराभवाच्या तावडीतून सुटका झाली होती. त्यांच्या खाती अनिर्णित लढतीतील एक गुण आहे.

‘‘पर्वरीतील मैदानावर शुक्रवारपासून खेळला जाणारा सामना लाल मातीच्या खेळपट्टीवरील पहिलाच आहे. गोमंतकीय क्रिकेटमधील हा नावीन्यपूर्ण प्रयोग आहे.

या खेळपट्टीची चाचणी घेण्यासाठी मोसमपूर्व सरावात काही सामने झालेले आहेत,’’ अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे या खेळपट्टीवर काम करणारे अनुभवी क्युरेटर सूर्यकांत नाईक यांनी दिली.

दोन्ही संघांच्या मागील सामन्यातील कामगिरीवर नजर टाकता, नव्या खेळपट्टीवर दोन्ही संघांतील फलंदाजांना संयमाने खेळावे लागेल आणि गोलंदाजांना स्फुरण चढू शकते.

सुयशकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

गोव्याचा प्रतिभाशाली फलंदाज सुयश प्रभुदेसाई याच्याकडून घरच्या मैदानावर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने २०२२-२३ मोसमातील पहिल्याच लढतीत राजस्थानविरुद्ध पर्वरीत द्विशतक (२१२) केल्यानंतर याच मैदानावर कर्नाटकविरुद्ध दोन्ही डावात अर्धशतके (८७ व नाबाद ६१) केली.

मात्र नंतर रणजी स्पर्धेतील सलग पाच सामन्यांत त्याला अर्धशतक नोंदविता आलेले नाही. त्याने १४ च्या सरासरीने १२६ धावा केल्या आहेत. त्रिपुराविरुद्ध सलामीला बढती मिळालेल्या सुयशला अनुक्रमे १३ व ९ धावाच करता आल्या.

डावखुरा अर्जुन तेंडुलकर वेगवान गोलंदाजीत योग्य दिशा व टप्पा शोधत आहे. गुरुवारी सरावाच्या कालावधीत सचिन तेंडुलकरचा मुलगा बराच वेळ नव्या खेळपट्टीचे निरीक्षण करताना दिसला. चंडीगडविरुद्धच्या लढतीत त्रिपुराविरुद्ध खेळलेलाच गोव्याचा अकरा सदस्यीय मैदानात उतरण्याचे संकेत आहेत.

दोन्ही संघ

गोवा: ईशान गडेकर, मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मोहित रेडकर, समर दुभाषी, अर्जुन तेंडुलकर, विजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब, अमूल्य पांड्रेकर.

चंडीगड: मनन वोहरा (कर्णधार), अर्स्लान खान, अरजित सिंग, कुणाल महाजन, गौरव पुरी, संदीप शर्मा, अश्विन मुरुगन, अर्पित पन्नू, हरनूरसिंग पन्नू, निप्पुण पंडिता, मयांक सिद्धू, जगजित सिंग, गुरिंदर सिंग, राज अंगद बावा, अंकित कौशिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT