Rama Kankonkar Attack Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Attack: रामा काणकोणकर हल्ल्यातील दोन संशयित तूर्त कोठडीतच, जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; गंभीर गुन्ह्याचा उल्लेख

Rama Kankonkar Attack Case Update: रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या गाजलेल्या प्रकरणात उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित आरोपी सुरेश नाईक आणि साईराज गावकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या गाजलेल्या प्रकरणात उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित आरोपी सुरेश नाईक आणि साईराज गावकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयामुळे या आरोपींना कोणताही दिलासा मिळालेला नसून त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते तर आरोपी जेनीटो कार्दोजो प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होता.

न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेले दोन्ही जामीन अर्ज न्यायालयाने कोणत्याही खर्चाशिवाय फेटाळून लावले. गुन्ह्याचे स्वरूप, तपासातील उपलब्ध पुरावे आणि आरोपांची गंभीरता लक्षात घेता सध्या जामीन मंजूर करण्यास कोणतेही कारण नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

मुख्य आरोपी जेनीटो कार्दोजो याला यापूर्वी जामीन मिळाला आहे. राज्य सरकारने आणि पीडित रामा काणकोणकर यांनी या जामीन आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असून राज्य सरकारने जेनीटो कार्दोजोला मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.

१७ जून रोजी सुनावणी

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाने प्रकरण १७ जून २०२६ रोजी आरोप निश्चितीपूर्वी युक्तिवादसाठी ठेवले आहे. या सुनावणीत सरकारी पक्ष न्यायालयाला आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, तर बचाव पक्ष आरोप निश्चित न करण्याची विनंती करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT