

पणजी: सर्वसाधरणपणे जूनमध्ये राज्यात सरासरी १० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असते. त्यानुसार राज्यात समाधानकारक पाऊस आहे, परंतु गेल्यावर्षी मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांना अजून पावसाने तीव्रता वाढली नसल्यासारखे वाटते. सध्या राज्यात मान्सून सामान्य असून पुढील चार - पाच दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले, राज्यात सध्या २८ टक्के पावसाचा तुटवडा जरी असला तरी येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाची सर आली की हा तुटवडा भरून निघेल. पुढील दोन दिवसांसाठी राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून पावसाच्या कालावधीत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
राज्यात ६ इंच पाऊस
राज्यातील काही भागांत मागील दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांत अतिशय जोरदार बरसात होत आहे. मागील २४ तासांत राज्यात सरासरी २०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात ६ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. २८ टक्के पावसाचा तुटवडा आहे.
मागील २४ तासांत काणकोण येथे २.१३ इंच, मुरगाव २ इंच, दाबोळी १.७६ इंच, मडगाव १.६१ इंच, केपे २५ मि.मी., साखळी १९.८ मि.मी., पणजी १५.८ मि.मी, पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील इतर भागांतही तुरळक पाऊस पडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.