Sadanand Sheth Tanawade Dainik Gomantak
गोवा

गोवा राज्यसभा निवडणूक! भाजपकडून सदानंद तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा, आज भरणार उमेदवारी अर्ज

Pramod Yadav

Goa Rajya Sabha Election 2023: राज्यसभेच्या गोव्यातील एकमेव जागेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव भाजप सुकाणू समितीने एकमुखाने गेल्या आठवड्यात निश्चित केले आहे. तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, तानावडे आज (मंगळवार, दि.11) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सदानंद शेट तानावडे आज दुपारी एक वाजता त्यांचा अर्ज दाखल करतील, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 28 जुलै रोजी संपत असल्याने 24 जुलै रोजी मतदान होत असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, राज्यात भाजपची बहुमत असलेली एकहाती सत्ता असून भाजपला राज्यसभेची जागा जिंकणे सहज सोपे आहे.

भाजपकडून या जागेसाठी तानावडे यांचा एकमेव अर्ज सुकाणू समितीसमोर होता. त्याला केंद्रीय समितीची अनुमती मिळाली असून, तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तानावडे आज दुपारी एकच्या सुमारास राज्यसभेसाठी त्यांचा अर्ज दाखल करतील.

संख्याबळ कसे आहे?

सध्या भाजपकडे स्वतःचे 28 आमदार असून, मगोपचे 2 आणि 3 अपक्ष मिळून 33 आमदार भाजपसोबत आहेत. विरोधकांकडे काँग्रेसचे 3, ‘आप’चे 2, तसेच गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांचे प्रत्येकी 1 असे मिळून सात आमदार आहेत.

भाजपकडील संख्याबळ पाहता तानावडे बहुमताने निवडून येतील. जर विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला नाही, तर तानावडे बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT