AAP Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील एकमेव राज्यसभा जागेसाठी 'आप'चा काय प्लॅन? अमित पालेकरांनी केली मोठी घोषणा

आम आदमी पक्षाने गोवा राज्यसभा निवडणुकीबाबत महत्वाची घोषणा केली आहे.

Pramod Yadav

Goa Rajya Sabha Election 2023: गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 24 जुलै रोजी मतदान होणार आहे. भाजपकाडून या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोण असेल याची चर्चा सध्या गोव्यात सर्वत्र होत आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने राज्यसभा निवडणुकीबाबत महत्वाची घोषणा केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव भाजप सुकाणू समितीने एकमुखाने गेल्या आठवड्यात निश्चित केले आहे. तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, तानावडे आज (मंगळवार, दि.11) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आपचे अमित पालेकर काय म्हणाले?

गोव्यातील राज्यसभा जागेसाठी आम आदमी पक्षाच्या ( AAP ) वतीने उमेदवार दिला जाणार नाही. पुरेसे संख्याबळ नसल्याने पक्षाने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे अमित पालेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याबाबत पालेकर यांनी नकार दिला आहे.

भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, तानावडे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपकडील संख्याबळ पाहता तानावडे बहुमताने निवडून येतील. जर विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला नाही, तर तानावडे बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT