Goa: Rajendra Arlekar's swearing in postponed  Dainik Gomantak
गोवा

Goa: राजेंद्र आर्लेकर यांचा शपथविधी तीन दिवसांनी लांबणीवर

Goa: आर्लेकर यांच्या शपथविधीसाठी पक्षाचे काही नेते व कार्यकर्ते शिमला जाण्याच्या तयारीत

दैनिक गोमन्तक

पणजी: हिमाचल प्रदेशचे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा शपथविधी आणखी तीन दिवसांनी लांबणीवर पडला आहे. तेथील माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे देहावसान झाल्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. (Goa: Rajendra Arlekar's swearing in postponed for three days)

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आर्लेकर यांच्याशी संपर्क साधून या दुखवट्याविषयी माहिती देत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्य प्रशासन शपथविधीची तयारी करेल अशी माहिती दिली. आर्लेकर यांनी तेथील सोयीनुसार शपथविधीची तारीख ठरवा, आपल्या बाजूकडून विशिष्ट तारखेचा आग्रह नाही, असे त्यांना सांगितले आहे.

दरम्यान, गेले दोन दिवस आर्लेकर यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र, पक्षाचे कार्यकर्ते व अन्य त्‍यांच्या मांगूर - वास्को येथील निवासस्थानी भेट घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या इमारतीसमोरच उभे रहावे लागत आहे. प्रत्येकाला त्यांच्यासोबत छायाचित्र टिपायचे असते. सध्या अशा घाईगर्दीतच त्यांना दिवस कसा मावळला हे समजत नाही.

कार्यकर्तेही जाण्यास उत्सुक

आर्लेकर यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, संघटन सचिव सतीश धोंड आदी उपस्थित राहण्याचे निश्चित असून या यादीत परवापर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे काही नेते व कार्यकर्ते शिमला येथे जाण्याची तयारी करू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT