Goa: नड्डांच्या भेटीनंतर बैठकीतील चर्चा गुप्त ठेवण्यासाठी भाजपची विशेष दक्षता

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डां हे रविवारी दुपारी दोन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर येत आहेत.
J. P. Nadda will arrive in Goa on Sunday
J. P. Nadda will arrive in Goa on SundayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्ढा (J. P. Nadda) हे रविवारी दुपारी दोन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर येत आहेत. एका तारांकीत हॉटेलात याखेपेस त्यांच्या बैठकांचे आयोजन भाजपने केले असून बैठकीतील बित्तंबातमी बाहेर फुटू नये यासाठी त्यांची भेट घेणाऱ्यांनी बाहेर पडताना तोंडाला कुलूप लावावे अशी व्यवस्था केली गेली आहे.

J. P. Nadda will arrive in Goa on Sunday
Goa Curfew: हॉटेल, रेस्‍टॉरंटचालकांची मनमानी, शिथिलतेचा गैरफायदा

पक्षाची गाभा समिती, प्रदेश पदाधिकारी, मंत्री व आमदार यांच्या बैठका ते घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची तयारी व त्रुटी याबाबत ते चर्चा करणार आहे. सोमवारी या बैठकांविषयी ते स्वतःच दुपारी 3 वाजता माध्यमांना माहिती देणार आहेत. या त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेआधी पक्षाच्या नेत्यांनी कल्‍पनांचे पतंग उडवू नयेत, विशेषतः उमेदवारीविषयी जाहीर भाष्य करू नये, अशी स्पष्ट सूचना पक्षाकडून देण्यात आली आहे.

J. P. Nadda will arrive in Goa on Sunday
Goa: गावठी चिकन झाले गरम, डिचोलीत किलोमागे 20 रुपयांनी वाढ

राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या बैठकांचे धावते समालोचन माध्यमांवर दिवसभर सुरू राहिल्यानंतर बैठकांतील कामकाज हा पक्षाचा अंतर्गत मामला असल्याचे सांगत नेत्यांनी आक्षेपार्ह मुद्दे बोलण्याचे टाळावे अशी सूचना पक्षाच्या मुख्यालयातून करण्यात आली आहे. या बैठकांदरम्यान नड्ढा हे राजकीय आढावा घेणार असल्याने आपापल्या मतदारसंघातील आपण करत असलेले काम त्यांच्‍यापर्यंत पोचावे यासाठी उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांनी पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू केल्याचे समजते.

रविवारी पक्षाची गाभा समिती, प्रदेश पदाधिकारी, मंत्री व आमदार यांच्या बैठका सोमवारी बैठकांविषयी दुपारी ३ वाजता माध्यमांना माहिती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com