अडवई भटवाडी येथे जमिनदोस्त झालेली घरे Dainik Gomantak
गोवा

Goa: होंडा, भिरोंडा परिसरात पुरमय स्थिती, अडवईतील घरे पाण्याखाली

पावसामुळे होंडा व भिरोंडा पंचायात क्षेत्रातील ओहळातील पाण्याची पातळी एकदम वाढल्याने नागरिकांच्या दुकाने व घरात पाणी शिरून लाखोचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे होंडा व भिरोंडा पंचायात क्षेत्रातील ओहळातील पाण्याची पातळी एकदम वाढल्याने नागरिकांच्या दुकाने व घरात पाणी शिरून लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, यामध्ये होंडा तिस्क येथिल विविध प्रकारच्या दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मालाची नुकसान झाली आहे, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना घरातील तसेच दुकानातील सामान बाहेर काढण्यास मिळाले नाही. त्याच प्रमाणे भिरोंडा पंचायत क्षेत्रात सुद्धा म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडवई, पाडेली, वांते, भिरोंडा, सावर्शे भागात बरेच नुकसान झाले आहे. (Goa Rains: Heavy rains and floods destroy houses)Dainik Gomantak

पाण्याखाली गेलेले अडवई परीसरातील घर

सद्या राज्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, ओहळ, नाले तुडुंब पाण्याने भरून वाहत आहे, त्यामुळे आज पहाटेच्या सुमारास पाण्याची पातळी वाढून होंडा पोस्तवाडा, आजोबा नगर या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या घरात शिरले, त्यामुळे घरातील किंमती सामान, कपडे खराब झाले आहे, तर होंडा तिस्क येथिल काही दुकानात पाणी शिरून मालाची नुकसान झाली आहे, आज सकाळी तीनच्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने बेकरीसाठी लागणारे सामान पुर्ण पणे खराब झाले असल्याची माहिती सिद्धेश मापारी यांनी दिली.

अशा प्रकारे इतरही काही दुकानात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे तिस्क परीसरात रस्त्यावर पाणी भरल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता, त्यामुळे सकाळच्या वेळी कामांवर ये जा करणाऱ्यांची वाहने अडकून पडली होती, त्यामुळे या परीसरातील कामगार वर्ग आज कामावर पोहोचला नाही, त्याच प्रमाणे वाळपईहून बांबोळी येथिल गोवा वैद्यकीय इस्पितळात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस न आल्याने होंडा, भुईपाल, पोस्तवाडा, या भागातील कर्मचाऱ्यांना बसची वाट पाहून घरी जाण्याची पाळी आली.

पाण्याखाली गेलेले अडवई परीसरातील घर

त्याच बरोबर जोरदार पावसाच्या तडाख्याने म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडवई येथिल शांतादुर्गा मंदीर अर्धे पाण्याखाली गेले होते, इतिहासात प्रथमच या मंदिरापर्यंत पाणी पोचण्याची घटना घडली आहे असे भिरोंडा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी सांगितले, यावरून या भागांत पाऊस किती पडला याचा अंदाज येतो. त्याच प्रमाणे भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई भटवाडी, पाडेली, वांते, गावकरवाडा भागात सुमारे दहा बारा घरे पडून नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत, त्यांना राहण्याची तसेच खाण्या पिण्याच्या समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे या भागात लाखोंच्या घरात नागरिकांचे नुकसान झाले असल्याचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी सांगितले.

या भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने काही नागरिक बेघर झाले आहेत, त्याना अग्निशमन दलाच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, त्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे शेवटी उदयसिंह राणे यांनी सांगितले.

रस्त्यावर पाणी वाढल्याने वाहनांना व्यत्यय निर्माण झाला

यामुळे या भागातील जनजीवन आज पहाटे पासून विस्कळीत झाले होते, मात्र काही प्रमाणात पावसाने विसव घेतल्याने सकाळी दहाच्या नंतर काही प्रमाणात रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह कमी झाला व वाहनांची ये-जा सुरू झाली.

या घटनेची दखल घेऊन होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी मतदार संघाचा दौरा करून संपूर्ण परीस्थितीची पहाणी केली व नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपुस केली, या पावसामुळे होंडा परीसरात दुकानदार तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामुळे त्यांना सरकारांकडून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे, या संबंधी आपण आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी बोलणी करणार असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT