Goa Rainfall Dainik Gomantak
गोवा

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 23.9 मिमी पावसाची नोंद, 30 इंचांचा टप्पा पार; चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

Goa Rainfall Update: राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी २३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पावसाने ३० इंचांचा टप्पा पार केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी २३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पावसाने ३० इंचांचा टप्पा पार केला आहे. मात्र, अद्याप राज्यात २७ टक्के पावसाची तूट कायम आहे.

पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ६६.४ मिमी (२.६१ इंच) पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल सांखळी येथे ४४.६ मिमी, सांगे येथे ३८.३ मिमी, म्हापसा येथे ३३.३ मिमी, फोंडा येथे ३० मिमी, दाबोळी १४.८ मिमी, पेडणे १२.६ मिमी, मुरगाव १०.६ मिमी, जुने गोवा ५.८ मिमी, काणकोण आणि पणजी येथे प्रत्येकी ४.२ मिमी पाऊस झाला.

दरम्यान, पावसामुळे राज्यातील विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. बायणा (वास्को) येथे अवर लेडी ऑफ कँडेलारिया शाळेजवळ रस्त्यावर माड कोसळला. खांडोळा येथील सरकारी महाविद्यालय परिसरात वाहनावर झाड पडल्याने नुकसान झाले. ब्रह्मकरमळी येथे मंदिराशेजारी काजूचे झाड रस्त्यावर कोसळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT