Weather Update Dainik Gomantak
गोवा

Weather Update: पावसाची सत्तरीकडे कुच; श्रावणातील ऊन-पावसाचा सुरेख खेळ, पणजीकडे पावसाची पाठ

Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर मंदावला असून, तुरळक पाऊस पडत आहे. पावसाने संथगतीने सत्तर इंचांचा टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात पावसाचा जोर मंदावला असून, तुरळक पाऊस पडत आहे. पावसाने संथगतीने सत्तर इंचांचा टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

राज्यात आतापर्यंत १७३१ मिमी म्हणजेच ६८.१७ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत पाऊस ७० इंचांचा टप्पा पूर्ण करेल, तर वाळपईत पाऊस शतकी सलामी देणार आहे. वाळपईत सर्वाधिक ९६ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली असून, राज्यात ३०.९ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविला आहे. मागील २४ तासांत मडगावात ४५ मिमी, मुरगावात २४ मिमी, केपेत २४ मिमी, वाळपईत २२.६ मिमी व इतर भागांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पणजीकडे पावसाची पाठ

राज्यात पाऊस ७० इंचांचा टप्पा पार करणार असला आणि अनेक भागांत ९० इंचांहून अधिक पाऊस पडला असला, तरी राजधानी पणजीत अजून ५० इंचांहूनही कमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वांत कमी, ४३ इंच इतका पाऊस पणजीत पडला आहे. पणजीसोबतच दाबोळीत ४६ इंच, तर मुरगावात ४५ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT