Goa rain alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

IMD yellow alert Goa: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पणजी: पाऊस परतीचा असला तरी त्याचा जोर मात्र अजूनही कायम आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे हवामान खात्याने (IMD) गोव्यासाठी पुढील दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस राहा सतर्क!

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी दक्षिण गोव्यात तुरळक पावसाची शक्यता आहे, परंतु त्यानंतर पुढील दोन दिवस उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात.

आगामी १ ते ४ तासांत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सत्तरीत मोठे नुकसान

काही दिवसांपूर्वीच परतीच्या जोरदार पावसाने सत्तरीतील काही भागांमध्ये मोठे नुकसान केले होते. वाळपई हॉस्पिटलसमोर स्थानिकांनी ढगफुटीसदृश पावसाचा अनुभव घेतला, तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. यामुळे अनेकांचे नुकसान झाले असून, स्थानिक नागरिक आता पाऊस कायमचा रामराम ठोकण्याची वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT