Goa Rain: ..होत्याचे न्हवते झाले! गोव्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; भातशेती झाली आडवी, लाखोंचे नुकसान

Goa heavy rain: संध्याकाळी सुमारे पावणे पाचच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला होता. विजेच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्याने पावसाने थैमान घातले.
Goa rain
Goa rainDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी कहर केला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीने अनेक भागांमध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

संध्याकाळी सुमारे पावणे पाचच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला होता. विजेच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्याने पावसाने थैमान घातले. केवळ अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड, घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. पाली, सत्तरी येथे प्रणिता बारसमोर आंब्याचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ठाणे सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीचे छप्पर उडून गेले.

अर्ध्या तासात दोन इंच; पणजीत कोसळली वीज

राज्यात शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. केवळ अर्ध्या तासातच पणजीत तब्बल ६० मिमी म्हणजे २ इंच पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश पडलेल्या अर्ध्या तासातील पावसाने नागरिकांची धांदल उडाली.

पणजीतील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पणजी बसस्थानकावर रात्री पडलेल्या पावसाचे पाणी सकाळपर्यंत साचून होते. दरम्यान, ताळगाव येथील रिसारा इमारतीवर असलेल्या विद्युत फलकावर वीज कोसळली. यामुळे तो फलक जळाला. इमारत आणि इमारतीतील राहिवाशांना कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नाही. पावसाचा क्षण टिपत असलेल्या एका नागरिकाच्या मोबाइर्लमध्ये ही घटना कैद झाली आहे.

भुईपाल येथे भातशेती आडवी

भुईपाल, सत्तरी येथे सुर्याकांत गावकर यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी शेतात साचून पिके पूर्णपणे नष्ट झाली. अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण सत्तरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.

Goa rain
Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

अनेकांची धावपळ; संपर्कही तुटला

वाळपई-रेडीघाट रस्त्यावर अनेक झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कामावरुन परत असताना अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली तसेच रस्ता बंद असल्याने उशिरापर्यंत लोकांचा संपर्क तुटला होता.

Goa rain
Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

वाळपईत तुंबली गटारे; पावसाचे पाणी रस्त्यावर

वाळपईत शनिवारी सायंकाळी गडगडाटासह मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी रस्त्यालगत गटारे बांधलेली आहेत. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा अडकून राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. ठाणे मार्गावरील एसबीआय बॅंकेजवळ पाणी रस्त्यावरुन वाहत होते. वाळपई नगरपालिका क्षेत्रात काही लोक आजही घरातील सांडपाणी गटारात सोडतात. त्यामुळे वाळपईतील काही ठिकाणी गटारात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. दरवर्षी गटारे तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे वाळपई शहरात सर्व प्रभागात रस्त्यांलगत गटारे बांधलेली आहेत. ही स्वच्छही केली जातात मात्र काही लोक घरातील कचरा टाकत असल्याने ही गटारे भरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com