Goa Floods Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Floods Updates: ग्रामीण गोवा पाण्यात, लोकांचा जीव मुठीत, इंटरनेट सेवा बंद

राज्याच्या पूर्व भागात आणि घाटमाथ्यावर, सह्याद्रीच्या पट्ट्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ग्रामीण गोवा पाण्यात गेला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या पूर्व भागात आणि घाटमाथ्यावर, सह्याद्रीच्या पट्ट्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ग्रामीण गोवा पाण्यात गेला आहे. नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. शेकडो घरांना पुराच्या पाण्याने वेढले. कित्येक गावांचा संपर्क तुटला. रस्ते खचण्याचे प्रकार घडले. दरडी कोसळल्या. भातशेती पाण्याखाली गेली. नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोक जीव मुठीत घेऊन आहेत. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये आपत्कालीन यंत्रणा पोहोचलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Rural Goa has gone underwater Internet service off)

राज्यात पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून कहर केला. अगोदरच पुराच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्व नद्यांनी पूररेषा सकाळीच ओलांडली. त्यानंतरदेखील मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सकाळपासूनच पूरस्थिती गंभीर बनली. बहुतांशी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लोक रस्त्यातच अडकून पडले. रेल्वे, विमान, रस्तेमार्ग बंद पडल्याने गोव्याचा इतर राज्यांशी संपर्कही तुटला होता.

Goa Rain Updates

गोव्याचा शेजारील राज्यांचा संपर्क तुटला : आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकात या दोन्ही राज्यांमधून जोडणारे रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडली आहे. ती पूर्ववत करण्यासाठीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पावसामुळे कोकण रेल्वेच्या 16 तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

इंटरनेट सेवा बंद

बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने नेट कनेक्टिव्हिटी आणि लोकांना संपर्क साधण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सरकारकडून जीव्हीके इएमआरआयकडून पर्यायी संपर्क क्रमांक जारी करावा लागला. ऑनलाइन शिक्षणातही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

पुराचा पहिला बळी

धारबांदोडा तालुक्यातील उदळशे येथील सत्यवती अनंत कालेकर (८५ वर्षे ) या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे कळते. साकोर्डा भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे आज शुक्रवारी पहाटे साडे चारच्या सुमारास रगाडा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मधलावाडा , मुरगे, उदळशे, पानसी आदी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या महापुरात २० जनावरे दगावली तर अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले. तांबडीसुर्ल येथील सह्याद्री पर्वताचा भाग पहाटे कोसळल्याने तेथून जलस्रोत मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT