Goa Rain
Goa Rain Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विक्रमी पाऊस; 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी, आतापर्यंत 1203 मिलिमीटर पाऊस

दैनिक गोमन्तक

पणजी : सक्रिय मॉन्सून आणि मध्यप्रदेश आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच पश्‍चिम किनारपट्टीवरील ‘ऑफशोर टर्फ’ अशा पावसासाठीच्या पुरक स्थितीमुळे राज्यात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत हंगामातील सर्वात जास्त 156.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा हा गेल्या पाच वर्षांतील विक्रम आहे. दक्षिण गोव्यातही जोरदार सरी कोसळत असून कुशावती नदीला पूर आला आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. नव्याने बनवलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या दरडीवरून माती रस्त्यावर येऊ लागली आहे. परिणामी राज्यातील सर्वच मार्गावरील वाहतूक कोलमडली असून वाहने कासवगतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. पश्‍चिम घाटात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तिथून वाहणाऱ्या सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही समोर आल्यात.

राज्यात यंदा वेळेआधी पाऊस दाखल होईल, अशी अपेक्षा असताना उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे सामान्य प्रमाणापेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाची सामान्य सरासरी अवघ्या 24 तासांत ओलांडली आहे. आजपर्यंत 1063.4 मिमी पावसाची नोंद अपेक्षित असताना 1203 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस नेहमीच्या पावसापेक्षा 13.2 टक्के जास्तीचा आहे.

पावसामुळे झालेल्या हानीसंदर्भात अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचलनालयाकडे एका दिवसात 121 कॉल आले. सर्वाधिक कॉल कुडचडे येथून आले होते. आपत्कालीन संचालनालयाला पाच घटनांमध्ये 11 जणांना वाचवण्यात यश आले. पारंपरिक मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तरी, डिचोली, सांगे, काणकोण तसेच राज्यातील इतर भागातील भागातील धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. प्रामुख्याने दूधसागर, हरवळे, कुमठळ, साट्रे, मायनापी-नेत्रावळी, बामणबुडो, खोतीगाव काणकोण, सुर्ला-सत्तरी आदी भागातील तसेच राज्यातील इतर चोर्ला तसेच अनमोड घाटातील लहान -मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.

पश्‍चिम घाटातल्या प्रामुख्याने कुशावती, साळ, दूधसागर या नद्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. काही पूल पाण्याखाली गेले आहेत. यासाठी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पणजी शहराचा कार्पोरेट कार्यालयाचा परिसर म्हणून ओळखला जाणारा पाटो अर्धा भाग सध्या पावसाच्या पाण्याखाली जात असल्याचे दिसते. त्यातच या परिसरातील सांडपाण्याच्या चेंबर भरून वाहत असल्याने ते घाण पाणी पावसाच्या पाण्यात मिसळले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT