Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: वादळी पावसाने गोव्याला झोडपले; वीजपुरवठा खंडित

Goa Unseasonal Rain: अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या तसेच वीजखांब कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन अनेक ठिकाणी अंधार पसरला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Unseasonal Rain

गोव्यात गुरुवारी (दि.23) संध्याकाळी सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगटांसह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या तसेच वीजखांब कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन अनेक ठिकाणी अंधार पसरला. जनजीवन विस्कळीत झाले. राजधानी पणजीसह, मडगाव, म्हापसा, डिचोली, सत्तरीत तर जोरदार पर्जन्‍यवृष्‍टी झाली.

‘रेमल’ चक्रीवादळाचा धोका

बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे २५ मेपर्यंत त्याचे ‘रेमल’ चक्रीवादळात रूपांतर होऊन ते २६ मे रोजी सायंकाळी पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, त्रिपुरा, मिझोराममध्‍ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गोव्यातही गडगडाटासह पर्जन्‍यवृष्‍टी होऊ शकते, अशी शक्यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे.

कोठे काय घडले?

वेळूस वीज उपकेंद्रावर वीज पडून इन्सुलेटरचा स्फोट.

नाणूस गोसंवर्धन केंद्राजवळ कोसळला वीजखांब.

शिगाव-कुळेत झाडांसह, वीजखांब पडले उन्‍मळून.

पिळगाव, डिचोलीतही झाडांची पडझड.

फोंड्यात कारवर माड कोसळून हानी, अनर्थ टळला.

नार्वेत वीजदुरुस्‍ती करताना शॉक लागून लाईनमन जखमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT