Quepem Dainik Gomantak
गोवा

Quepem: माड-बाणसायची भातशेती पाण्याखाली, 50 शेतकऱ्यांचे नुकसान; 'अवकाळी'च्या तडाख्यामुळे कष्टावर पाणी

Goa Rain Update: मंगळवारपासून अचानक सुरू झालेल्या पावसाचा फटका कुडचडे येथील शेतकऱ्यांना बसला आहे. भातशेती कापणीच्या तोंडावर येऊनही शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Sameer Amunekar

केपे: मंगळवारपासून अचानक सुरू झालेल्या पावसाचा फटका कुडचडे येथील शेतकऱ्यांना बसला आहे. काकूमड्डी-कुडचडे येथील नंदा तळ्याच्या बंधाऱ्याची दारे उघडल्याने माड-बाणसाय येथील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने सुमारे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भातशेती कापणीच्या तोंडावर येऊनही शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदीच्या दुथड्या भरून पाणी वाहू लागले आहे. माड-बाणसाय येथे पावसाच्या व नंदा तळ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सुमारे पन्नास शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे.

कालपासून जोरदार पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आमची शेती पाण्याखाली गेल्याचे संतोष देसाई या शेतकऱ्याने सांगितले. या भागातील काही शेतकऱ्यांनी शेतीची मशिनद्वारे कापणी केली होती व आम्हीही कापणीच्या तयारीत होतो; पण अचानक आलेल्या पावसामुळे आमची शेती नष्ट झाली, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी आम्ही शेती करतो व पावसापूर्वी आम्ही शेतीची कापणी करत होतो; पण यावेळी अवकाळी पाऊस आल्याने आमच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. आम्ही मोठ्या कष्टाने ही शेती केली होती.

प्रत्येक शेतकऱ्याने किमान साठ हजार ते एक लाख रुपये या शेतीवर खर्च केले होते. तो खर्च व आमचा वेळ वाया गेला आहे, असे सुयश सावंत यांनी सांगितले. राज्य सरकारने आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार!

यावेळी केपेचे विभागीय कृषी अधिकारी कृतिराज नाईक गावकर व सचिन गावकर यांनी त्वरित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या शेतीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यात कुणाचाच दोष नाही; पण शेत कापणीच्या तोंडावर हे संकट ओढवले असल्याने आपण यात स्वतः लक्ष घालून नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT