Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: कुडचडेत विजेच्या खांबावर पडले आंब्याचे झाड; वाहतुकीला अडथळा

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update: काल (22 मे) रात्रीच्या सुमारास राज्यभरात विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटही झाला.

यामुळे कुडचडे मतदारसंघातील झोरीवाडो बेठमोड्डी परिसरात एक विजेचा खांब पडल्याची माहिती समोर आली आहे. या विजेच्या खांबावर आंब्याचे झाड पडल्याचे खांबाचे नुकसान झाले आहे.

रस्त्याच्या मधोमध हा खांब आणि आंब्याचे झाड पडल्याने यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकांनी लवकरात लवकर हा खांब रस्त्यावरून बाजूला करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दरम्यान, ग्रामीण भागात तर विजांचा लखलखाट आणि ढगांच्‍या गडगडाटासह पाऊस पडला. त्‍यामुळे वीजही ‘गुल’ झाली. परिणामी बहुतांश भागात काळोख पसरला होता. डिचोली, साखळी, वाळपई, कुळे, काणकोण, सांगे, फोंडा, सावर्डे येथे रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने लोक हैराण झाले होते. त्यात कालपासूनच ढगाळ वातावरण होते. आज उष्णता आणखी वाढली होती. सर्वजण चातकासारखी पावसाची वाट पाहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT