Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व तयारी ठेवण्याबरोबर त्याची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातच्या प्रश्‍नावर विशेष बैठक घेऊन त्यावर पर्याय काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update :

पणजी, आगामी मान्सूनच्या तयारीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता.१७) महसूल सचिव व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत पूर्वआढावा बैठक घेतली.

पावसाळ्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व तयारी ठेवण्याबरोबर त्याची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातच्या प्रश्‍नावर विशेष बैठक घेऊन त्यावर पर्याय काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याने यावर्षी लवकर व जोरदार मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्‍भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी तयार राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही आपत्तीच्यावेळी जीव वाचवण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व सज्जता आवश्‍यक आहे यावर त्यांनी भर दिला. वस्तीच्या ठिकाणी दरडी कोसळण्याची क्षेत्रे तसेच वादळी निवारा याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या.

मुंबईत हल्लीच होर्डिंग्स कोसळून झालेल्या घटनेचा संदर्भ देत सचिव संदीप जॅकीस यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही आपत्तीसाठी दक्ष राहण्यास सांगितले. प्रतिकूल परिस्थितीला जलद व परिणामकारक प्रतिसाद मिळावा यासाठी उपाययोजनांचे निर्देश त्यांनी दिले.

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी २४ तास तयार व सक्रिय राहून उपलब्धता ठेवा. भूस्खलन, पूर व सर्वसामान्यांना प्रभावित करणारी धोकादायक झाडे यांची माहिती मिळवून त्यावर पर्याय काढा, अशाही सूचना करण्यात आल्या.

नियंत्रण कक्षाची स्थापना

यावेळी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी पुरेशा पायाभूत सुविधा सज्ज करून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत नियंत्रण कक्षाचे कामकाज, पूर व भूस्खलन प्रवण क्षेत्राची ओळख व आपत्तीच्या परिस्थितीत योजना, नाले, स्मार्ट सिटी कामांचा दर्जा यासह इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी कोकण रेल्वेचे अधिकारीही उपस्थित होते. कोणतेही खोदकाम होणार नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केली.

विविध खात्यांना सूचना

पूर, दरड कोसळणे तसेच आदी आपत्तीजनक घटना घडल्यास त्या ठिकाणी प्रथम धाव घेणाऱ्या पोलिस व अग्निशमन दलाला सर्व तयारी करण्यास सांगण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम खात्याला पोकलिन, शॉवेल तसेच कर्मचाऱ्यांची उपलब्धता याकडे लक्ष देण्यास सांगितले. लोकांसाठी उभारण्यात आलेले वादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठीचे निवारे यांची वारंवार पाहणी करावी.

नागरी पुरवठा खात्याने वापराविना असलेल्या गोदामांची डागडुजी करावी. आपत्तीवेळी त्याचा वापर लोकांना त्या ठिकाणी हलविण्यासाठी होईल.

पावसाळ्यात मोठ्या प्रमणात आजारांचे प्रमाण वाढते त्यामुळे आरोग्य खात्याने मान्सूनपूर्वी विषाणूनाशक फवारणी करण्याच्या सूचना सचिव संदीप जॅकीस यांनी केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MBBS Admission: एमबीबीएस प्रवेशातील 3% ‘सीएसपी’ आरक्षण रद्द करा! हायकोर्टाचे तांत्रिक शिक्षण संचालनालयाला निर्देश

Goa Politics: गोवा वाचवण्यास समविचारी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे! कॅ. विरियातो यांचे प्रतिपादन; बोगस मतदारांवरून मांडली भूमिका

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Vote Chori: पत्ता नेपाळींचा, राहतात भलतेच! गोवा काँग्रेसची घराघरांत जाऊन पडताळणी; बोगस मतदारांची पोलखोल

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

SCROLL FOR NEXT