Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्याला अवकाळी पावसाचा तडाखा; रिपरिप सुरूच, आगामी 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा IMD चा अंदाज

Heavy Rain in Goa: पणजीत सखल भागात साचले पाणी

Akshay Nirmale

Heavy Rain in Goa: गोव्याला बुधवारी 8 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाने तडाखा दिला. पहाटे साडे चारच्या सुमारास गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाची रिपरिप पहाटे सात नंतरही सुरू होती.

ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे अनेक भागात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पणजी शहरात बुधवारी पहाटेच्या पावसाने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा वेधशाळेने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वर्तवलेल्या अंदाजात दिवसभरात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आगामी तीन ते चार तासांमध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये गोव्यात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो, या काळात 40 ते 60 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील, असे म्हटले आहे.

सकाळी 6 वाजून 25 मिनिटांच्या ढगांच्या स्थितीनुसार सुमारास राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांवर ढग जमा झाले होते.

आयएमडीने या अवकाळीच्या जोरदार तडाख्याच्या पार्श्वभुमीवर नागरिकांसाठी काही सूचना केल्या आहेत. वादळी पावसावेळी खुल्या भागात काम करू नका, उंच झाडांखाली आसरा घेऊ नका, वीजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर्सपासून लांब राहा,

इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर या काळात टाळा, पाणी साचत असलेल्या भागात जाणे टाळा, आयएमडीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा, असे आयएमडीने म्हटले आहे.

दरम्यान, गोवा वेधशाळेने मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुढील तीन ते चार तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

त्यावेळी वर्तवलेल्या अंदाजात म्हटले होते की, काणकोण, केपे, सांगे, तिसवाडी, बार्देश, पेडणे येथे ढग जमा झाले असून ते पश्चिमेच्या दिशेने सरकत आहेत. या अंदाजानुसारच पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास गोव्यात गडगडाटी पावसाला सुरवात झाली.

राज्यात सध्या 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेलाही काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT