Goa Rain Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोंयकरांना पाऊस सोडेना!! विजांचा कडकडाटासह जोरदार बरसणार, 29 ऑक्टोबरपर्यंत 'Yellow Alert'

Yellow Alert Goa: या काळात ३०-४० किमी/ताशी वेगाने विजांचा कडकडाट आणि ५० किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

Goa Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती कठीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ३०-४० किमी/ताशी वेगाने विजांचा कडकडाट आणि ५० किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

हवामान विभागाने जनतेला विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विजांच्या कडकडाटादरम्यान मोकळ्या जागेत जाणे पूर्णपणे टाळावे आणि समुद्रातील परिस्थिती कठीण असल्याने समुद्रात जाण्यापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.

'डबल सिस्टीम'मुळे पावसाचा जोर वाढला

गोव्यातील पावसाच्या वाढलेल्या तीव्रतेमागे दोन वेगवेगळ्या हवामान प्रणालींचा संयुक्त प्रभाव असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी 'गोमन्तक'ला माहिती देताना सांगितले.

१. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा: गोव्यापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या स्थिर आहे.

२. बंगालच्या उपसागरातील चक्रीय वादळ: दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला दुसरा कमी दाबाचा पट्टा चक्रीय वाऱ्यात रूपांतरित झाला असून, तो पश्चिमेकडे सरकत आहे.

या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे गोव्यासह संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील या चक्रीय वाऱ्यांची दिशा आणि त्यांचा वेग पुढील काही दिवसांत पावसाची नेमकी तीव्रता किती असेल, हे ठरवणार आहे. तरीही, सध्याची हवामान स्थिती आणि वातावरणातील बदल पाहता, पुढील आठवडाभर राज्यात मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: 'अलविदा...' रोहित शर्माची पोस्ट व्हायरल! 'मुंबईचा राजा' घेणार निवृत्ती? चाहते चिंतेत

Goa Agriculture Damage: मोरजीत परतीच्या पावसाचा हाहाकार, भात शेती पाण्याखाली

Government Jobs: गोवा सरकारची मेगा भरती! आरोग्य खात्यात 59, तर समग्र शिक्षा अभियानात 66 कंत्राटी पदांसाठी 'सुर्वणसंधी'

7 मिनिटांत 850 कोटींचा दरोडा, नेपोलियन बोनापार्टच्या बायकोचे दागिने केले लंपास; जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम चोरीप्रकरणी दोघे अटकेत!

Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

SCROLL FOR NEXT