goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain : पर्जन्‍यराजाने घेतला श्‍वास; जोर मंदावला

Goa Weather Update : दरम्‍यान, गेल्‍या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे लोकांना सूर्यदर्शन झाले नव्‍हते. ढग काळोख करून यायचे आणि धो-धो पाऊस कोसळायचा.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, मागील दोन आठवड्यांपासून राज्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. परंतु अधूनमधून सरी सुरूच आहे.

त्‍यामुळे झाडे कोसळणे, घरांची पडझड आदी प्रकार घडत आहेत.

दरम्‍यान, गेल्‍या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे लोकांना सूर्यदर्शन झाले नव्‍हते. ढग काळोख करून यायचे आणि धो-धो पाऊस कोसळायचा.

मात्र आज सोमवारी सूर्यदर्शन झाले आणि लोकांना हायसे वाटले. दरम्‍यान, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४२.२ मिमी म्हणजेच १.६६ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण २६१६ मिमी म्हणजेच १०२.९९ इंच पाऊस पडला आहे.

पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात पुढील २३ आणि २४ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ तर २५ आणि २६ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्‍या २४ तासांत केपेत सर्वाधिक ६० मिमी पाऊस पडला. फोंडा : ४५.८, मडगाव : ४८.४, वाळपई : ४५.१, सांगे : ४४.४, मुरगाव : ४२.८, दाबोळी : ४२.२, काणकोण : ४०.४, जुने गोवा : ३९.८, पणजी : ३७.८, पेडणे ३३.४, म्हापसा ३२ तर साखळीत २८.६ मिमी पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT