imd alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: 'गोंयची दिवाळी, पावसांन व्हावली', हवामान खात्याकडून Yellow Alert; नागरिक आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Goa Rain Yellow Alert: राज्य हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' कायम ठेवला असून, येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहण्याची शक्यता

Akshata Chhatre

Goa Diwali Weather: गोव्यात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, परतीच्या पावसाचा जोर आणि काही ठिकाणी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. राज्य हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' कायम ठेवला असून, येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवाळीचा मुख्य दिवस उत्साहात पार पडला असला तरी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या मुहूर्तावर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

goa diwali weather

मंगळवारी (दि. २१) सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या लगबगीदरम्यान हा नैसर्गिक प्रकोप अनुभवण्यास मिळाला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या जोरदार पावसाने मये आणि डिचोलीच्या काही भागांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला.

या वादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. या पडझडीची झळ केवळ रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, चार घरांना आणि एका गोठ्यालाही बसली. यामुळे या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.

या चक्रीवादळामुळे मयेसह डिचोली भागात मोठी हानी झाली आहे. वीजवाहिन्या तुटून वीज खांबांचीही मोडतोड झाली. परिणामी, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचबरोबर, मये भागातील बागायतींमध्येही मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मॉन्सूनने माघार घेऊनही गोव्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे आता पुढील सणांवर (पाडवा, भाऊबीज) याचे सावट आले आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT