Minister Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Roads: "रस्त्यावर खड्डा दिसला की फोन करा, 24 तासांत दुरुस्त करतो", मंत्री कामतांनी दिली गोवेकरांना Guarantee

Digambar Kamat Pothole Guarantee: नागरिकांनी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे कठोर निर्देश दिले

Akshata Chhatre

पणजी: राज्यातील रस्त्यांची दुरवस्था कायम असून, अनेक ठिकाणी नागरिकांना खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी तोडगा काढलाय. त्यांनी गोव्यातील नागरिकांना आश्वासन दिले आहे की, रस्त्यांवरील खड्डे कळवल्यास २४ तासांत ते दुरुस्त केले जातील. नागरिकांनी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. म्हापसा मतदार संघात रस्त्यांचे खोदकाम करून त्यामधून केबल घालण्याचे काम सुरू असल्याने रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. पावसाळ्यात तिसवाडीतील रस्त्यांची दुर्दशा ही नेहमीचीच समस्या बनली आहे. त्याचप्रमाणे, साष्ट्री तालुक्यातही रस्त्यांची चाळण झाली आहे.

यावर्षी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील डांबर उखडले असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळुस नगरगाव मार्गावरील श्री रवळनाथ मंदिराकडील मुख्य रस्त्याची अवस्थाही फार खराब आहे.

त्यामुळे वाहनचालकांना आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पेडणे ते भटवाडी हरमल, पार्से ते आगरवाडा, चोपडे ते मोरजी, मराठवाडा मांद्रे, आराबो ते तुये यांसारख्या अनेक भागांतील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे.

यावर उपाय म्हणून मंत्री कामत यांनी सांगितले की, सप्टेंबर अखेरपर्यंत दोन हॉट मिक्स प्लांट पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे रस्त्यांच्या हॉट मिक्सिंगचे काम सुरू होण्यास मदत होईल. रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी बुजवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या कामाची वैयक्तिकरित्या पाहणी करून ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री देण्याचे वचन दिले आहे.

मडगाव येथील एका सत्कार सोहळ्यात बोलताना कामत यांनी आपण २४ तास लोकांसाठी उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. त्यांनी यापूर्वी एक लोकप्रिय नेता म्हणून केलेल्या कामाची आठवण करून देत, नागरिकांना आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आश्वासनामुळे गोव्यातील नागरिकांना लवकरच चांगल्या रस्त्यांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Eknath Shinde's 'X' Account Hacked: उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकर्सनी पाकिस्तान, तुर्कीच्या झेंड्याचे फोटो केले पोस्ट शेअर

"मला नोकरांसारखं वागवलं, शिवीगाळ केली", भाजीपाव खाताना पर्यटकाला आला 'वाईट' अनुभव; रेडिटवरील Post Viral

Glowing Mushrooms: सगळीकडे मिट्ट काळोख असताना, 'त्या' झाडावर पांढरा प्रकाश दिसत होता; गोव्याच्या जंगलातील 'चमकणारी बुरशी'

Adhaar Card Free Update: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

Lisbon vs Goa travel: गोव्यात पोर्तुगीज आलेच नसते तर पोदेर, उंडे असते का?

SCROLL FOR NEXT