John Nazareth Dainikl Gomantak
गोवा

Goa News: रुग्णालयात बनावट कागदपत्राद्वारे नोकरी; बडतर्फ करा- जॉन नाझारेथ

Goa News: सेवेतून निलंबित करेपर्यंत आझाद मैदानावर लाक्षणिक आंदोलन करीत राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात गेली 12 वर्षे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बनावट प्रमाणपत्रे सादर करून साहाय्यक म्हणून नोकरी मिळवली असून त्याला सेवेतून निलंबित करेपर्यंत आपण आझाद मैदानावर लाक्षणिक आंदोलन करीत राहणार असल्याचे सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी आझाद मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना घोषणा केली. (Goa News)

सतिश नामक कर्मचारी या मनोरुग्ण इस्पितळात सुतार काम करीत होता. जेव्हा ऑक्युपेशनल थेरेपी या विभागात तांत्रिक पद निर्माण झाले, तेव्हा सदर व्यक्तीस ते पद देण्यात आले. त्यासाठी जोडण्यात आलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे बनावट असल्याचा दावा नाझारेथ यांनी केला आहे.

एकाच वेळी चार ठिकाणी काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र त्याने जोडले होते. ज्या काळात त्याने महाराष्ट्रातून प्रशिक्षण घेतले होते. त्याच काळात पर्वरी येथेही तो प्रशिक्षण घेत होता, असे त्याने सादर केलेल्या कागदपत्रावरून समजते, अशी माहिती त्यांनी दिली.

वशिल्याने सदर भरती झाल्याचा आरोप करताना आपणाकडे सर्व पुरावे असल्याचे ते म्हणाले. पोलिस स्थानकात तक्रार देऊन झाली, तरी कारवाई होत नाही. खात्यांतर्गत कारवाईही केली जात नाही. जोपर्यंत सदर कर्मचाऱ्याला निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आपले आंदोलन चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

न्याय मिळावा..

यापूर्वी एका युुवकाने आवाज उठवला होता. सदर कर्मचारी बडतर्फ व्हावा, म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले होते. त्या युवकाचे निधन झाल्याचे आपल्याला समजले. त्याला न्याय मिळावा म्हणून आपण हे आंदोलन करीत असल्याचे नाझारेथ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT