पणजी: गोव्यातील समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या २४ किनाऱ्यांचा समावेश किनारी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) २०१९ च्या अधिसूचनेत करण्याची मागणी वनखात्याने केली आहे. यासंदर्भात अंडी घालण्याच्या ठिकाणांची अक्षांश व रेखांशासह (जीपीएस) सविस्तर माहिती पर्यावरण व हवामान बदल खात्याला सादर करण्यात आली आहे.
वनखात्याच्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील १० आणि दक्षिण गोव्यातील १४ किनाऱ्यांवर यापूर्वी समुद्री कासवांनी अंडी घातल्याची नोंद आहे. उत्तर गोव्यात मोरजी, मांद्रे, वागातोर, कळंगुट, कांदोळी, केरी, मिरामार, आश्वे, बागा आणि हरमल या किनाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात राजबाग, मोबोर, काब-द-राम, पाटणे, बायणा, पाळोळे, बाणावली, खोला, कार्मोणा, केळशी, वार्का, तळपण, आगोंद आणि गालजीबाग या किनाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.
वनखात्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने यासंदर्भातील पत्र पर्यावरण खात्याच्या संचालकांना पाठविले आहे. समुद्री कासवांच्या प्रजननासाठी वाळूचे किनारे महत्त्वाचे असून, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या २४ किनाऱ्यांना अधिकृत पर्यावरणीय संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने वनखात्याची मागणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील किनारे
उत्तर गोवा (१०) : मोरजी, मांद्रे, वागातोर, कळंगुट, कांदोळी, केरी, मिरामार, आश्वे, बागा, हरमल.
दक्षिण गोवा (१४) : राजबाग, मोबोर, काब-द-राम, पाटणे, बायणा, पाळोळे,बाणावली, खोला, कार्मोणा, केळशी, वार्का, तळपण, आगोंद, गालजीबाग.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.