Ferdino Rebello, Yuri Alemao, Crlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "गोव्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अवैध कामांविरुद्ध पुढे यावे"! फर्दिन रिबेलो, LOP युरी, आमदार फेरेरा यांच्यात चर्चा

Ferdino Rebello: फर्दिन रिबेलो यांची काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी भेट घेतली. या बैठकीत रिबेलो यांच्याशी त्यांनी राज्यातील सध्याच्या समस्यांवर चर्चा केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या रक्षणाविषयी मार्ग काढण्याकरिता पुढाकार घेतलेल्या अलहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांची काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी भेट घेतली. या बैठकीत रिबेलो यांच्याशी त्यांनी राज्यातील सध्याच्या समस्यांवर चर्चा केली.

आलेमाव म्हणाले, पर्यावरण आणि परंपरांचे संरक्षण करण्यासाठी न्या. रेबेलो यांच्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणे दिलासादायक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या गोव्यासाठी एका चांगल्या भविष्याकडे वाटचाल करू.

राज्यातील विनाशकारी कृत्यांमुळे सामान्य जनता संतप्त आहे. पण परिस्थिती अशी आहे की, त्यापैकी काहीजण याबद्दल आवाज उठवत नाहीत, कारण सध्याचे सरकार सुडाचे राजकारण करते. जे लोक अवैध कामांविरुद्ध बोलतात, त्यांना मारहाण केली जाते किंवा अनेक प्रकारे त्रास दिला जातो. आपणास खात्री आहे की, न्या. रिबेलो यांनी केलेल्या आवाहनामुळे लोक राज्याचे संरक्षण करण्यास प्रोत्साहित होतील.

युरींचा पूर्ण पाठिंबा

न्या. रिबेलो यांनी केलेल्या आवाहनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या राज्याचे संरक्षण केले पाहिजे. गोव्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राज्यात होत असलेल्या अवैध कामांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आलेमाव यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कसे कोसळले 'कला अकादमी'चे छत? ‘टास्क फोर्स’ची होणार बैठक; हैद्राबादच्या अहवालाकडे विशेष लक्ष

Tourist In Goa: हडफडेतील आग, इंडिगोमुळे पर्यटक असंतुलित! पर्यटनमंत्री खंवटेंचे स्पष्टीकरण; टॅक्सी, खड्डे, मोकाट गुरे याबाबत घेणार बैठक

Kalsa Banduri Project: 'म्हादई'च्या परिसंस्थेला धोका! कळसा प्रकल्पावर केंद्रीय समितीची नोंद; पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणामांची शक्यता

Goa Crime: पत्नीच्या वागणुकीवर आला संशय, पतीने डोक्यात घातला दगड; संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल

Goa Weather Update: थंडी मंदावली, तापमान वाढले! गोव्यात पुढचे काही दिवस कसे राहील हवामान? वाचा वेधशाळेचा अहवाल..

SCROLL FOR NEXT