‘गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या'! न्या. फर्दिन रिबेलो व्यापक लोकचळवळीच्या दिशेने; जनतेच्या जाहीरनाम्यावर होणार शिक्कामोर्तब

Ferdino Rebello: ‘गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या लोकचळवळ उभारू’, या निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या आवाहनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Ferdino Rebello
Ferdino Rebello Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या लोकचळवळ उभारू’, या निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या आवाहनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी तयार केलेल्या जनतेच्या जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी ‘इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा’च्या मोठ्या सभागृहात मंगळवार, ६ रोजी दुपारी ३.३० वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

न्या. रिबेलो यांच्या म्हणण्यानुसार, गोव्याच्या विदारक विनाशाविषयी त्यांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त केलेल्या भूमिकेला ज्या भावनेने आणि एकजुटीने गोमंतकीयांनी प्रतिसाद दिला, ते पाहून मनापासून समाधान वाटले. माध्यमांतून उमटलेला माझा आवाज हा आपल्या मातृभूमीबद्दलची सामूहिक वेदना आणि खोल चिंता स्पष्टपणे व्यक्त करणारा होता.

Ferdino Rebello
..जबाबदार अधिकाऱ्यांना 'निलंबित' करा! गोव्यातील बेकायदेशीर कृत्यांविरोधात कडक कारवाई आवश्यक; फर्दिन रिबेलोंचे ठाम मत

या प्रतिसादामुळे गोव्याच्या संरक्षणासाठी एकत्रित जनआंदोलन उभारण्याची गरज अधिक ठामपणे अधोरेखित झाली असून संपादकीय लेखन आणि दूरचित्रवाणीवरील चर्चांनाही त्यामुळे चालना मिळाली आहे. ही चळवळ तिच्या योग्य आणि न्याय्य टप्प्यापर्यंत नेण्यासाठी, ज्यांनी पाठिंबा दिला, सक्रिय सहभाग व्यक्त करण्याची इच्छा दर्शवली, अशा सर्वांची बैठक बोलावली आहे.

Ferdino Rebello
हडफडेतील 'ती' दुर्घटना नव्हे हत्याच! डॉ. ऑस्कर आज परप्रांतीय गेले, उद्या गोमंतकीयांवर बेतेल - डॉ. ऑस्कर रिबेलो

कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

न्या. रिबेलो यांनी गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर आवाहन केल्यानंतर अनेक जुने समाज कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. समाजक्रांती होऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांना पुन्हा मिळाला आहे. त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होणे सुरू केले आहे. त्या वाढत्या दबावामुळेच हरमल येथील हंगामी भू-रूपांतर रद्द करण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या कार्यकर्त्यांनी लोकचळवळ अधिक बळकट करण्यासाठी बैठक घेण्याचा विचार मांडणे सुरू केले होते. त्यानुसार आता ही बैठक होत आहे.

गोव्याच्या आत्म्याचे जतन करण्यासाठी कटिबद्ध असलेले अभिमानी, सजग आणि संवेदनशील गोमंतकीय मंगळवारच्या बैठकीस उपस्थित राहतील, अशी मनापासून अपेक्षा आहे.

न्या. (निवृत्त) फर्दिन रिबेलो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com