Goa Agriculture  Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: पडिक जमिनीत किफायतशीर शेती; 170 एकरमध्ये लागवड

चिंचोणे कृषी क्लबचा अभिनव उपक्रम; जलस्रोतमंत्र्यांचे सहकार्य

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: चिंचोणे गावात चिंचोणे कोमुनिदाद व या कोमुनिदादचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो यांनी पुढाकार घेऊन चिंचोणे कृषी क्लबची स्थापना केली असून पडिक जमिनीचे रूपांतर कृषी उत्पादनासाठी वापरणे हे लक्ष्य ठेवले आहे.

या क्लबमध्ये सध्या 50 पेक्षा जास्त शेतकरी एकत्रित आले असुन गेल्या 30 वर्षांपासून पडिक असलेल्या 500 एकर जमिनीतील 170 एकर जमिनीवर शेती लागवड सुरू केली आहे. त्यामुळे हा परिसर हिरवागार झाला आहे.

गोव्यात ग्रामीण भागात लाखो चौरस मीटर पडिक जमिनी आहेत. पण त्यांचा योग्य वापर करण्याकडे कोणी लक्षच देत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

सुरवातीला या पडिक जमिनीचे शेतीमध्ये रूपांतर करताना बरेच त्रास झाले. तपकिरी तांदळाचे उत्पादन करण्यात आले. याकामी आम्हाला डॉन बॉस्को कृषी इन्स्टिट्यूटचे फा. जॉर्ज क्वाद्रोस यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

आता हळूहळू यामध्ये फायदा होत आहे. सध्या वायंगण (खरीप)चे पीक, अळसांदे, काळिंग व इतर भाज्यांची लागवड सुरू केली आहे. जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही आम्हाला चांगली मदत केल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.

तरुणांचा कल आधुनिक तंत्रज्ञानाकडे

वेगवेगळे उपक्रम राबवून व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाज्या किंवा फळे उत्पादन करण्याकडे तरुणांचा कल दिसत आहे.

कमी कष्ट आणि अधिक काम, याकडे युवकांचा कल आहे. गोव्यात कमीतकमी 30 हजार शेतकरी तयार व्हावेत, अशी हल्लीच जलस्त्रोत व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी एका कार्यक्रमात इच्छा व्यक्त केली होती. सरकारने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले असून अनेक योजनाही जाहीर केल्या आहेत.

या गावात कृषी क्षेत्राचा विकास करणे हे क्लबचे मूळ तत्त्व आहे. शिवाय पडिक जमिनी कचरा फेकण्यासाठी वापरात येऊ नयेत, या जमिनींवर बिल्डर्सनी नजर ठेवू नये, अशीच आम्हा सर्वांची भावना आहे. आमच्या पूर्वजांनी या जमिनींचे रक्षण केले आहे, त्यांचा आदर करणे हेही आमचे कर्तव्य आहे. - आग्नेल फुर्तादो, चिंचोणे कोमुनिदादचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT