Alka Lamba Dainik Gomantak
गोवा

Goa: पश्चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधण्यासाठी केंद्रातूनही दबाव आणू: लांबा

असे आश्वासन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी आज येथील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांना दिले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगावातून (Madgaon) जाणारा पश्चिम बगल रस्ता (Western bypass road) बाणावली ते सुरावली या भागात मातीचा भराव घालून न उभारता तो स्टिल्ट (खांबावर) वर बांधावा यासाठी दिल्लीतूनही केंद्र सरकारवर दबाव आणू असे आश्वासन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी आज येथील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांना दिले.

साळ नदी (Sal River) बचाव आंदोलनाच्या नेत्या रॉयला फेर्नांडिस (Royla Fernandes) यांनी आज लांबा याना साळ नदीच्या किनारी आणून हा रस्ता मातीचा भराव घालून उभारल्यास या भागात पावसात कसा पूर येऊ शकतो याची माहिती करून दिली. हा रस्ता स्टिल्टवर बांधण्यासाठी जर सरकारकडे पैसे नसल्यास काही काळासाठी हा प्रकल्प स्थगित ठेवावा पण घाईघाईने तो पूर्ण करू नये अशी मागणी फेर्नांडिस यांनी केली.

यावेळी बोलताना रॉयला सारख्या कार्यकर्त्या राज्याचे पर्यावरण राखण्यासाठी जे कार्य करतात ते कौतुकास्पद असून भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी पर्यावरणावरही घाला घालण्यास उठले आहेत असे लांबा म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर हा प्रश्न आपण मांडू. या प्रकरणी दिल्लीतून केंद्र सरकारवर (Central Government) दबाव आणणे शक्य असल्यास तोही आम्ही आणू असे आश्वासन त्यांनी दिले.

हा बगल रस्ता मातीचा भराव घालून उभारल्यास येथील खारफुटी सह पाण्यातील इतर जीवसृष्टीवर त्याचे विपरीत परिणाम होणार असे सूचित करीत फेर्नांडिस यांनी हा प्रश्न राष्ट्रीय हरित लवादाकडे नेला होता. फेर्नांडिस यांच्या म्हणण्यात प्राथमिक तथ्य आढळल्याने लवादाने गोवा सारकरलाव10 तज्ज्ञांची समिती स्थापुन 2 आठवड्यात त्यावर निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता. या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली असून येत्या आठवड्यात त्या समितीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत निदान पर्यावरणाच्या भल्याचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा यावेळी फेर्नांडिस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT