Birthday  Dainik Gomantak
गोवा

Pratapsingh Rane Birthday: शाश्वतरित्या विकास करणारं प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे, 'प्रतापसिंह राणे'- सावंत

Pratapsingh Rane Birthday: प्रतापसिंह राणे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

Ganeshprasad Gogate

Pratapsingh Rane Birthday: राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे सत्तरीचे ‘साहेब’ तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्‍यावर त्‍यांच्‍या 85 व्‍या वाढदिनानिमित्त सकाळपासून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

कुळण-साखळी येथे त्यांच्‍या निवासस्थानी अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन राणे यांचे अभीष्टचिंतन केले. त्‍यांच्‍या सौभाग्‍यवती विजयादेवी राणे, पुत्र तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सूनबाई तथा आमदार डॉ. दिव्या राणे, कन्‍या विश्र्वधरा यांनी चाहत्‍यांच्‍या शुभेच्‍छांचा स्‍वीकार केला.

CM

‘द मेकर व माॅडर्न गोवा’ चे प्रकाशन

सत्तरीत उत्‍साहाचे वातावरण असून, विविध खात्यांचे अधिकारी, ग्रामस्‍थ, महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन राणे यांना उत्तम आयुआरोग्‍य लाभो, अशा सदिच्‍छा व्‍यक्‍त केल्‍या.

दरम्‍यान, पर्ये येथील भूमिका देवी मंदिराच्‍या परिसरातील मोठ्या मैदानावर विजयादेवी राणे लिखित ‘द मेकर व माॅडर्न गोवा’ या प्रतापसिंह राणे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या पुस्‍तकाचे प्रकाशन झाले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, भाजपचे नेते सदानंद तानवडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विजयादेवी राणे, पुत्र मंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे तसेच राज्यातील बड्या उद्योजकांनी यावेळी उपस्थिती लावली होती.

भूमिका मैदानावर भव्य मंडप

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सलग 10 वेळा निवडून येऊन विश्वविक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत ते कधीही पराभूत झाले नाहीत.

त्यांनी मुख्यमंत्री, सभापती आणि विरोधी पक्षनेते ही पदे भूषवली आहेत. या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी पर्ये -सत्तरी येथील भूमिका मैदानावर भव्य मंडप उभारला असून मुंबई येथील एका नामांकीत एजन्सीने हे काम हाती घेतले आहे. एकूण 50 हजार आसन व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT