Deepak Kesarkar |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Deepak Kesarkar: गोव्यात ‘मराठी’चा प्रश्न सामोपचाराने सुटेल !

Deepak Kesarkar: महाराष्ट्र-गोव्याचा ऋणानुबंध

दैनिक गोमन्तक

Deepak Kesarkar: गोवा आणि महाराष्ट्राचे संबंध ऋणानुबंधांचे आहेत, जशी महाराष्ट्रात मराठी राजभाषा झाली आहे तसाच गोव्यातही मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणार असून हा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सामोपचाराने सोडवतील, असा विश्वास महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मालपे पेडणे येथे व्यक्त केला.

वैश्य कुलगुरूंची कालडी ते काशी शांकर एकात्मता पदयात्रेच्या निमित्ताने श्री श्री वामनाश्रम महास्वामींचे मालपेत आगमन झाले होते. खास त्यांच्या दर्शनासाठी मंत्री केसरकर महाराष्ट्रातून मालपे येथे आले होते.

त्यावेळी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. यावेळी प्रकाश गोवेकर, विश्वास शेट कोरगावकर मयूर शेट स्वार, राकेश स्वार, प्रशांत धारगळकर आदींनी मंत्री केसरकर यांचे स्वागत केले.

केसरकर म्हणाले, मराठीची अस्मिता अन् संस्कृती ही सर्वज्ञात आहे. राज्यात सुरू असलेला मराठी-कोकणी वाद मुख्यमंत्री सावंत नक्कीच सामोपचाराने सोडवतील. आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन 4 रोजी मुंबई येथे होणार आहे. मराठी बोलणारे परदेशी नागरिकही या संमेलनात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा करणार !

मंत्री केसरकर म्हणाले, गोवा आणि मराठीचं नातं हे वेगळं नातं असून ते मनापासून जपलं पाहिजे. कोकणी ही मराठीची बोलीभाषा असून मातृभाषा मराठी असल्यामुळे पूर्वीपासून मराठीतूनच प्राथमिक शिक्षण घेणारे अनेक नागरिक आहेत.

मराठी आणि राज्याचं नातं दृढ करण्यासाठी आणि मराठीला योग्य ते स्थान मिळवून देण्यासाठी आपणही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहे.

वैश्य समाज संघटित व्हावा : केसरकर

वैश्य समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे जे विखुरलेला समाज आहे. त्यांना एकत्रित आणण्याचे कार्य अखिल भारतीय वैश्य समाजाचे अध्यात्मिक केंद्र असलेल्या गुरु मठ हळदीपूर मठाचे मठाधिपती वामनाश्रम महास्वमिजींच्या संकल्पामुळे होत आहे.

शांकर एकात्मता पदयात्रेच्या माध्यमातून वैश्‍य समाजाच्या संघटित होण्यातून संकल्पपूर्ती व्हावी, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मालपे पेडणे येथे श्री स्वामीजींचे आशीर्वाद घेतल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT