Prakash Velip Dainik Gomantak
गोवा

Reservation: गोव्यातही अनुसूचित जमातींना आरक्षण हवे- प्रकाश वेळीप

Reservation: अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोवा दौऱ्या दरम्यान उटा संघटनेच्या माध्यमातून भेटणार..

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा राज्यात अनुसूचित जमातीला शिक्षण, नोकरी, व इतर सर्व ठिकाणी आरक्षण दिले जाते मात्र केवळ विधानसभा निवडणुकीत आरक्षण दिलेले नाही. देशातील सर्व राज्यांमध्ये ते आहे केवळ गोव्यात नाही. आम्हांला 12 टक्के आरक्षण मिळणे ही घटनात्मक रास्त मागणी असल्याने यासंबंधी चर्चा करण्यासाठी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या गोवा भेटी दरम्यान उटा संघटनेच्या माध्यमातून भेटणार असल्याचे प्रतिपादन उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

ते गोमंत साहित्य सेवक मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी दुर्गादास गावडे, सतीश वेळीप, विश्‍वास गावडे, अनिल गावकर, भालचंद्र उजगावकर, दया गावकर, मालू वेळीप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान ते म्हणाले, पंतप्रधानांना अनुसूचित जमातीच्या नागरिकांची आपुलकी आहे, आदिवासींच्या इतिहासाशिवाय या देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे त्यांचे मत आहे त्यामुळे हा प्रश्‍न त्यांच्‍या नजरेत आणून द्यावा आणि येत्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.

जनजागृती करणार

  • राज्यातील सर्व पंचायत तसेच नगरपालिका क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातीचे नागरिक राहतात. मात्र अजूनही अनेकांना त्यांचे अधिकार माहीत नाहीत. सरकारी योजनांची माहिती नाही. त्यासोबतच शिक्षण, स्पर्धात्मक परीक्षा, सामूहिक शेती, स्वच्छता तसेच इतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

  • समाजातील जे युवक पदवीधर आहेत. त्यांनी किमान एक वर्ष सामाजिक सेवेसाठी द्यावे, यासाठी उटामित्रांची संकल्पना असून त्याद्वारे समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले.

  • महामेळाव्याचे आयोजन करणार

    25 मे हा दिवस प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. उटा संघटनेच्या वतीने यंदा प्रेरणादिन साजरा केला जाईल यासाठी आझाद मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करणार असून त्यात राज्यभरातील अनुसूचित जमातीचे नागरिक तेथे उपस्थित राहातील, असे वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT