Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Goa Power Shutdown: उत्तर गोव्यातील 'या' भागात 26 नोव्हेंबरला राहणार वीज पुरवठा बंद

Goa Power Shutdown : थिवी वीज उपकेंद्रात 26 नोव्हेंबरला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Power Shutdown: उत्तर गोव्यातील म्हापसा, पर्वरी, साळगाव, कांदोळी, हणजूण या भागातील रहिवाश्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय.

26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते सायंकाळी5.30 या वेळेत वर नमूद केलेल्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

थिवी वीज उपकेंद्रात उद्या रविवारी म्हणजेच 26 नोव्हेंबरला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

थिवीमध्ये येणाऱ्या २२० किलोव्होल्ट (केव्ही) विजेचे रुपांतर ३३ केव्ही करण्यासाठी जो पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, त्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल बदलण्याचे काम उद्या केले जाणार आहे. शिवाय या भागात नवीन अतिरिक्त केबल्सही बसवण्यात येणार आहेत. हे देखभाल दुरुस्तीचे काम सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत करण्यात येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.

विशेष म्हणजे उत्तर गोव्यातील करासवाडा औद्यागिक वसाहत, मोपा विमानतळ, अस्नोडा आणि चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्प यांना मात्र तात्पुरती अन्य ठिकाणांहून व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वीज खात्यातर्फे कळवण्यात आली आहे.

थिवीमध्ये चालणारे हे काम योगीराज पॉवरटेक प्रा. लि. या कंपनीला देण्यात आल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT