Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

विद्युत विभागाचा 1603.11 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार : ढवळीकर

40 कोटी रुपये खर्चून मोठ्या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या विद्युत विभागाने 1603.11 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा नोडल एजन्सी, आरईसी लिमिटेडला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी दिली.

पत्रकारांशी बोलताना ढवळीकर म्हणाले की, या प्रकल्पामध्ये ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, आरएमयू, ओव्हरहेड कंडक्टर आणि भूमिगत केबल टाकणे याचा समावेश आहे. तीन नवीन 33/11kV सबस्टेशन आणि स्मार्ट मीटरिंगसह IT आणि OT प्रकल्प देखील यात समाविष्ट आहेत.

महसुलात सुमारे 30 कोटींची वाढ

वीज खात्याने एका महिन्यात चार हजार कनेक्‍शन जारी केली आहेत, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. एकरकमी समझोता, नवीन कनेक्‍शन आणि इतर माध्यमातून खात्याच्या महसुलात 25 ते 30 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी 40 कोटी

जुन्या किंवा जास्त ताण असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमुळे उद्योगांना विजेची समस्या भेडसावत आहे. अतिरिक्त शुल्क भरूनही सरकार खुल्या बाजारातून वीज खरेदी करू शकते, असा आरोप उद्योगांनी केला आहे. लोडशेडिंग आणि वीज पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे मोठे नुकसान होत आहे. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची कार्यादेश दिले आहेत. या कामाला एक महिना लागेल. 40 कोटी रुपये खर्चून मोठ्या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT