Nodal delivery center Goa Dainik Gomantak
गोवा

Nodal Delivery Center: आता पोस्टल सर्व्हिस होणार 'गतिमान'! पर्वरीत नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू

Goa postal services: गोवा प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने पर्वरी येथील टपाल कर्मचारी वसाहतीत १० जानेवारीपासून नोडल डिलिव्हरी सेंटरचा प्रारंभ करण्यात आला.

Sameer Panditrao

Nodal Delivery Center Goa Porvorim

पणजी: टपाल विभागच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने पर्वरी येथील टपाल कर्मचारी वसाहतीत १० जानेवारीपासून नोडल डिलिव्हरी सेंटरचा प्रारंभ करण्यात आला. या केंद्राचा शुभारंभ टपाल सेवा विभागाचे संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते आणि वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल. एन. राव यांच्या उपस्थितीत झाला.

या सेवेच्या दुचाकी आणि चारचाकी वितरण वाहनांना पाटील हिरवा बावटा दाखवला. पणजी, करंझाळे, सांताक्रूझ दोनापावला, पर्वरी आदि भागात या सेवे अंतर्गत सर्व प्रकारचे पार्सल वितरित केले जाणार आहे.

याशिवाय उत्तर गोव्यातील किनारी भागातून फिरत्या वाहनाद्वारे पार्सल बुकिंग आणि संग्रहण करण्याच्या सेवेचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला. या माध्यमातून टपाल विभागाची वितरण कार्यक्षमता, विश्वासहर्ता आणि गती सुधारण्याच्या दिशेन ही एक महत्वपूर्ण असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नोडल डिलिव्हरी सेंटरचे उद्‍घाटन आणि गोवा विभागात घरोघरी संग्रहण आणि पार्सल बुकिंगची विशेष सेवा आमच्या ग्राहकांना अतुलनीय गुणवत्ता सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी, व्यवस्थापन आणि सेवा वितरण प्रणालीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे कार्यक्षमतेने आणि सुविधेसह समुदायाची सेवा करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला या सेंटरमुळे बळकटी दिली आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT