Goa Post Office  Dainik Gomantak
गोवा

Sukanya Samriddhi Yojana: गोवेकर सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या ; गोवा टपाल विभागाचे आवाहन

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अमृतपेक्स प्लस’ कार्यक्रम आयोजित केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) हि मुलींसाठी एक उत्तम योजना आहे. 10 वर्षांपेक्षा लहान मुलींच्या (Girl) नावाने हे खाते उघडता येते. या योजनेत दरमहा काही पैसे जमा केले जातात. योजनेच्या मॅच्युरिटीवर एकर कमी रक्कम उपलब्ध आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अमृतपेक्स प्लस’ कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ आणि ‘अमृतपेक्स 2023 साठी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाती उघडण्यासाठी हा व्यापक कार्यक्रम आयोजित केला आहे.

(Goa Postal Department appeals that citizens avail benefits of Sukanya Samriddhi Scheme)

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 24 तासांत राष्ट्रीय पातळीवर 7.5 लाख सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, गोवा टपाल विभागाने 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांना जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे आवाहन केले आहे.

योजनेच्या तपशीलासाठी नागरिकांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी नजीकच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन टपाल खात्याकडून करण्यात आले आहे.

Goa Post Office

सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के आहे. 2014 मध्ये पंतप्रधान मोदीनी हि योजना सुरु केली होती. 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने हे खाते उघडता येते. मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी ही योजना परिपक्क होते. या योजनेत किमान 250 रुपये जमा करता येतात, एका आर्थिक वर्षात कमाल मर्यादा रु. 1.5 लाख रूपये आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत भारतातील मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा बँकेमध्ये (Bank) फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते कुटुंबातील दोन मुलींसाठी उघडता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT