Sanjay School Porvorim Dainik Gomantak
गोवा

Sanjay School Porvorim: ‘त्या’ दिव्यांगाची प्रकृती चिंताजनक, मुख्यमंत्र्यांकडून घटनेकडे दुर्लक्ष

पर्वरीत संजय स्कूलची धोकादायक जुनी इमारत वापरात का?

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjay School Porvorim पर्वरी येथील संजय स्कूलच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या सिडनी डिसोझा (वय 40 वर्षे) या दिव्यांगावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

तो जबानी देण्याच्या स्थितीत नसल्याने डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची जबानी नोंद करण्यास परवानगी दिली नाही, अशी माहिती पर्वरीचे पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे. संजय स्कूलची इमारत जुनी असून ती सरकारी मालकीची आहे. दिव्यांग सिडनी हा पडून जखमी झाल्याने याप्रकरणी संजय स्कूलचे व्यवस्थापन जबाबदार आहे का, तसेच ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी दिव्यांगासोबत आलेल्या त्याच्या आईची जबानीही नोंदवली आहे. त्याच्या कंबरेच्या मणक्यात फ्रॅक्चर झाले आहे, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो धोक्यातून बाहेर आलेला नाही, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कानाडोळा; संताप व्यक्त

दिव्यांगांसाठी असलेल्या जुन्या संजय स्कूल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून झालेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आली होती.

दिव्यांगांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात हस्तक्षेप होऊन त्यावर ते काही तरी सूचना करतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

Arunachal Pradesh Landslide: कारवर कोसळले भलेमोठे दगड, प्रवासी थोडक्यात बचावले; अरुणाचल प्रदेशातील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT