Banastarim Bridge Accident: अटकेनंतर अवघ्या सहा तासांत पालेकरांना सशर्त जामिन

बाणस्तारी अपघात प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप
Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Banastarim Bridge Accident: Amit Palekar ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष तथा प्रसिद्ध वकील अमित पालेकर यांनी बाणस्तारी येथील अपघातानंतर मर्सिडीस कारचा बनावट चालक पोलिसांसमोर उभा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून क्राईम ब्रँचने त्यांना गुरुवारी दुपारी तीन वाजता अटक केली.

मात्र, रात्री नऊ वाजता ॲड. पालेकर यांची फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. अटकेनंतर सहा तासांतच पालेकर कोठडीबाहेर आल्याने क्राईम ब्रँचच्या या कारवाईमुळे सरकार तोंडघशी पडले आहे.

बाणस्तारी अपघाताच्या घटनेला एक महिना पूर्ण होण्यास काही दिवस असतानाच आम आदमी पक्षाचे नेते तथा प्रसिद्ध वकील अमित पालेकर यांना झालेली अटक, ही राज्यात वादाचा विषय ठरली असून लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी ‘आप’ला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याची टीका होत आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असली तरी तपासाच्या नावाखाली राजकीय खेळी केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

गुन्हेगारी प्रकरणांची बाजू न्यायालयात मांडण्यात हातखंडा असलेले प्रसिद्ध वकील पालेकर यांना पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने बाणस्तारी अपघातप्रकरणी ॲड. पालेकर यांना गुरुवारी त्यांच्या घरी जाऊन चौकशीसाठी ताब्यात घेतले.

नंतर दुपारी त्यांना अटक केली. त्यांच्यावर अपघातातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे. अटक झाल्यानंतर संशयित अमित पालेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर करताना ५० हजारांची वैयक्तिक हमी व तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करण्यास सांगितले आहे. तपासकामात सहकार्य करण्याचे तसेच पोलिस बोलावतील तेव्हा उपस्थित राहण्याची अट घातली आहे.

बाणस्तारी अपघाताच्या दिवशी ज्या पार्टीला सावर्डेकर कुटुंब उपस्थित होते, त्यावेळी ॲड. पालेकर हेही पार्टीला उपस्थित राहिल्याची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती. ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वा. पणजीच्या दिशेने येताना हा अपघात घडला.

तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेला मर्सिडीस कारचालक श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याने दोन दुचाकी आणि तीन चारचाकींना ठोकर दिली. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर चालक परेश तेथून गायब झाला, तर त्याची पत्नी मेघना कारमध्येच होती. पोलिस कारचालकाचा शोध घेत होते. अपघातानंतर तेथे ॲड. पालेकर पोहचले होते.

संशयित परेशला तेथून गायब करण्यामागे तसेच त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला उभे करण्यामागे त्यांचीच चाल होती, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून त्या दिशेने चौकशी सुरू आहे.

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Prostitution in Goa: वेशावस्ती सुरू करण्याची मागणी दुर्दैवी - पांडे

दरम्यान, या प्रकरणी परेशला १८ दिवसांच्या कोठडीनंतर सशर्त जामीन मिळाला आहे, तर त्याची पत्नी मेघना हिला देखील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मेघना आणि तिच्या मुलांची जबानी पोलिसांनी तसेच प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवली आहे.

आज सुनावणी

फोंडा : ॲड. अमित पालेकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर पालेकर यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जामीन मंजूर झाला असला तरी पुढील सुनावणी शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे. दरम्यान, फोंड्यातील ‘आप’चे नेते ॲड. सुरेल तिळवे यांनीही पालेकर यांच्या सतावणुकीबद्दल सरकारचा निषेध केला आहे.

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Durand Cup Football: एफसी गोवाचे आव्हान संपुष्टात

बनावट चालकालाही अंतरिम जामीन : आज सुनावणी

ॲड. अमित पालेकर हे बनावट चालकामागील सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सावर्डेकर कुटुंबीयांना ते जवळचे असल्याने त्यांनी तपासात अडथळा आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

गुरुवारी पालेकर यांच्यासह बनावट चालक राजू लमाणी यालाही पोलिसांनी अटक केली. मात्र, फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांनाही अंतरिम जामीन मंजूर केला.

बाणस्तारी अपघाताशी माझा काहीच संंबंध नाही. काही दिवसांपूर्वी मी भाजपमध्ये यावे, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. याप्रकरणी एका बनावट चालकाला क्राईम ब्रँचने चौकशीसाठी आणले आहे.

त्याच्या आधारे मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी राजकीय प्रतिमा मलीन केली जात आहे. - ॲड. अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, ‘आप’.

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Morjim Beach Goa: पारंपरिक मच्छीमारांनी बनवलेल्या झोपड्या पर्यटन विभागाने हटवल्या

मुख्यमंत्री सावध

बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना अटक केली. मात्र, या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात पोलिस तपासासाठी जे काही आवश्यक आहे ते केले जात आहे, असे ते म्हणाले.

...असा झाला उलगडा

  • अपघातानंतर मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण म्हार्दोळ पोलिस स्थानकात स्वतः हजर झाला होता.

  • ती अपघातग्रस्त कार मीच चालवत होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले.

  • घटनास्थळी जमाव जमल्याने मारहाणीच्या भीतीने तेथून पळालो, असे कारण त्याने सांगितले.

  • मात्र, त्याची ही माहिती पोलिसांना संशयास्पद वाटली.

  • परेशला वाचवण्यासाठी या तरुणाला पाठवले होते का, असा संशय पोलिसांना आला.

  • पोलिसी खाक्या दाखवून तरुणाची चौकशी केली, तेव्हा एका वकिलाचे नाव समोर आले.

  • या प्रकरणातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com