Betting in Porvorim  Dainik Gomantak
गोवा

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश; 12 जणांना अटक

पोलिसांची कारवाई: 2 लाखांचे साहित्य जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Online Cricket Betting पर्वरी येथील ‘मंत्री हॉटेल’मध्ये पर्वरी पोलिसांनी काल मध्यरात्री छापा टाकून तेथील एका खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

या कारवाईत सट्टा घेताना 12 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २ लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.

त्यामध्ये १० मोबाईल, लॅपटॉप, वायफाय राऊटर याचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पर्वरी पोलिस स्थानकाच्या पथकाने ही कारवाई केली. न्यूझिलंड विरुद्ध यूएई यांच्यात सुरू असलेल्या T-20 सामन्यासाठी संशयित ऑनलाईन सट्टा लोकांकडून स्वीकारत होते.

हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी छापा टाकल्याने तेथील सट्टेबाजांची धावपळ सुरू झाली आहे. पोलिस पथकाने त्यांना खोलीतच ठेवून चौकशी सुरू केली. सट्टेबाजीसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य या हॉटेलच्या खोलीतून जप्त करण्यात आले.

अधीक्षक वाल्सन व उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलिसांनी हा छापा टाकला. या सट्टेबाजीवेळी अटक केलेल्यांची नावे संजय सुब्बा (दिल्ली), करण राजेश पाटील (अकोला), नवीन बत्रा (छत्तीसगड), वरिंदर सिंग एन. (छत्तीसगड), अमित मोरे (अकोला), अंकित कुमार (झारखंड), सूरज नागदेव (छत्तीसगड), किशन पोपटनी (छत्तीसगड), तिलेश कुमार कुर्रे (छत्तीसगढ), श्रेय शर्मा एन (छत्तीसगढ) व आशिष एन (राजस्थान) अशी आहेत.

या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीसाठी संशयितांनी मंत्री या हॉटेलमध्ये तीन खोल्या घेतल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून हा सट्टेबाजीचा व्यवहार सुरू होता.

हॉटेलच्या व्यवस्थापकाने या खोल्यांमध्ये सुरू असलेला प्रकार माहीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठीचा अहवाल संबंधित अधिकारिणीकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT