Goa News | Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोपाळकृष्ण गजानन देवस्थानचा सुवर्णमहोत्सव

Goa News: श्री गोपाळकृष्ण गजानन देवस्थानचा यंदाचा सुवर्णमहोत्सवी पन्नासावा वर्ष सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: कासवाडा - तळावली येथील श्री गोपाळकृष्ण गजानन देवस्थानचा यंदाचा सुवर्णमहोत्सवी पन्नासावा वर्ष सोहळा 27 ते 31तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला सुवर्ण महोत्सवी आयोजन समितीचे अध्यक्ष वीजमंत्री सुदिन ढवळीकर,

कार्याध्यक्ष मिथिल ढवळीकर, निमंत्रक प्रदीप पुंडलिक शेट, देवस्थानचे अध्यक्ष विश्‍वास पांडुरंग नाईक, सचिव महेश वारो नाईक, सहसचिव अमिंद चंद्रकांत नाईक व समिती सदस्य साईश रामा नाईक आदी उपस्थित होते.

27 रोजी सकाळी श्रीला अभिषेक त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. दुपारी बारा वाजता आरती व नंतर महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता स्वर गणेश हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ वाजता देवबाभळी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल.

28 रोजी श्रीची पालखीतून गावात मिरवणूक निघेल. दुपारी महाप्रसाद, हरीपाठ होईल. भजनसंध्या कार्यक्रम होईल. 29 रोजी सकाळी अभिषेक, दुपारी बारा वाजता आरत्या व महाप्रसाद होईल. दुपारी तीन वाजता मनिला क्रिएशन व बोरीच्या नवदुर्गा गोपाळकृष्ण फुगडी मंडळातर्फे फुगडीचा कार्यक्रम होईल.

संध्याकाळी पाच वाजता शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. संध्याकाळी सात वाजता मान्यवरांचा सन्मान सोहळा होईल. 30 रोजी सामूहिक महापूजा व दुपारी महाप्रसाद होईल. संध्याकाळी पाच वाजता शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. रात्री आठ वाजता काले सांगेच्या श्रीहरी आरती मंडळातर्फे आरत्या व नंतर महाप्रसाद होईल.

रात्री नऊ वाजता कट्यार काळजात घुसली हा नाट्यप्रयोग होईल. 31 रोजी दुपारी तीन वाजता सरस्वती कलामंडळ केळबाय कुर्टीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम. कीर्तन तसेच संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कार्याध्यक्ष मिथिल ढवळीकर यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT