फोंडा शहर परिसरातील सदर गणेशोत्सव मंडळ, बुधवारपेठ गणेशोत्सव मंडळ तसेच झरेश्वर गणेशोत्सव मंडळाने मर्यादित स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
झरेश्वर गणेशोत्सव मंडळाचा गणपती प्रतीवर्षाप्रमाणे जुन्या बसस्थानक परिसरात, झरेश्वर गणेशोत्सव मंडळाचा गणपती मार्केटमध्ये तर सदर गणेशोत्सव मंडळाचा गणपती तिस्क - फोंडा येथील मंडळाच्या कार्यालयातील सभागृहात होणार आहे. स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले असले तरी वैयक्तिकरीत्या घराघरात पूजणारा गणपती बहुतांश ठिकाणी दीड दिवसांचा असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव जास्तीत जास्त पाच दिवसांचा करण्याचा मानस व्यक्त केला, पण हे सगळे परिस्थिती पाहूनच, अशीही पुस्ती जोडली.
कलाकारांची झाली गोची
कोरोनामुळे कलाकारांची अतिशय गोची झाल आहे. गेल्यावर्षी एकही कार्यक्रम झाला नाही. निदान यावर्षी तरी कार्यक्रम होतील अशी अपेक्षा या कलाकारांनी बाळगली होती, पण अजून सरकारची मार्गदर्शिका जाहीर झालेली नाही. त्यातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करण्याबाबत विचारच केलेला नाही, त्यामुळे यंदाही कलाकारांची चतुर्थी कोरडीच जाणार आहे.
फोंडा (प्रतिनिधी) ः गेल्या वर्षी कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर (shri Ganesh,Goa) पडले होते, त्यामुळे सगळे कार्यक्रम ठप्प झाले. (Ponda Ganesh festival canceled) यंदाही कोरोना आहे, मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाचा उद्रेक कधीही होऊ शकतो त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सावध भूमिका घेत कार्यक्रमांना फाटा दिला आहे. फोंडा तालुक्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून काही मोजकी मंडळे पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याबाबत विचार करीत आहे, तरीपण केवळ धार्मिक विधी सोडल्यास अन्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्दच करण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.