Goa: पेडणेच्या नगरसेविका रमल्या गणेशमुर्त्या रंगवण्यात

कलेची आवड (Love of Art) असली तर सवड नक्की मिळते; नगरसेविका पालयेकर (Goa)
Pernem Corporator Palayekar Painting Ganesh idols at Pernem  Goa
Pernem Corporator Palayekar Painting Ganesh idols at Pernem GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. उलट पुरुषांच्या चार पाऊले पुढे आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पेडणे पालिकेची नगरसेविका (Pernem Corporator) आश्विनी अरुण पालयेकर. इथे नगरसेविका अश्विनी पालयेकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण चार भिंतीच्या आड न राहता, मुलाबाळांचे शिक्षण, घरसंसार व्यवस्थित करून आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी पालिकेच्या निवडणुकीतही विजयी होवून आपल्या प्रभागाचा विकास करत असताना आपल्या अंगातील कला चार ठिकाणी पोचावी यासाठी त्या आजची आपल्या चित्रशाळेत वेळात वेळ काढून गणेश मुर्त्या रंगवण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळते.

Pedne's corporator Palayekar and his fellow painters while painting Ganesh idols at Pernem
Pedne's corporator Palayekar and his fellow painters while painting Ganesh idols at PernemDainik Gomantak

खारेबांध - पेडणे येथील पालयेकर कुटुंबियांची शेकडो वर्षांपासूनची गणेश मूर्ती (Ganesh Idol In Pernem) बनवण्याची परंपरा आहे. त्यांची गणेश मूर्ती चित्र शाळा (Ganesh Art School) ही गांधीतीर वाड्यावर एका जुन्या वास्तू मध्ये आहे. मागच्या १०० वर्षांपेक्षा जास्त काळ या वास्तूमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर घरातील तसेच सार्वजनिक गणेशमुर्त्या बनवण्याचे काम सुरु आहे. पालयेकर बंधूंची ही चित्रशाळा पूर्ण पेडणे तालुक्यात परिचित आहे. शेकडो वर्षांची परंपरा जसे पुरुष मंडळी राखतात त्याच प्रमाणे कालांतराने स्त्रिया देखील आपली गणेशमूर्ती बनवण्याची कला सादर करू लागल्या आहेत.

painters while painting Ganesh idols at Pernem
painters while painting Ganesh idols at PernemDainik Gomantak

नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर आश्विनी म्हणते आपण मागच्या २० वर्षापासून गणेशमुर्त्या रंगवण्याचे काम करते, मूर्त्यांना कसा रंग भरावा याविषयी आपले पती अरुण पालयेकर व दीर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. गणेशमूर्तीना रंग देताना जो आनंद मिळतो तो आणखी कोणत्याही कलेत मिळत नाही, आपण रंगवलेल्या मुर्त्यांचे घरोघरी पूजन केलेले पाहिल्यावर आपल्या कलेचा हा एक वेगळाच सन्मान जाणवत असल्याचे त्या म्हणतात.

Pernem Corporator Palayekar Painting Ganesh idols at Pernem  Goa
हिमालयाची उंची अन् समुद्राच्या खोलीचा समन्वय राखून कार्य करणार: राज्यपाल आर्लेकर

पर्यावरणा पूरक मुर्त्या (Eco friendly idols) आमच्या चित्र शाळेत मागच्या १०० वर्षापेक्षाही जास्त काळापासून चालू आहे. त्यात आजपर्यंत खंड पडू दिला नाही. सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या प्रभागातील काही महिला नागरिक समस्या घेवून येतात त्या समस्या ऐकून घेवून त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे नगरसेवक पालयेकर म्हणाल्या. चित्रशाळेत मुर्त्या रंगवत असतानाच इतर कामाकडे आपण लक्ष देते, सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी घरच्या मंडळींचे वेळोवेळी सहकार्य मिळतच असते.

Pernem Corporator Palayekar Painting Ganesh idols at Pernem  Goa
हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

कोरोनाच्या महामारीमुळे रंगांचे आणि शाडू मातीचे भाव वाढल्याने गणेश भक्ताना त्यांचा आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी व्यावसायिक म्हणून नव्हे तर कलाकार म्हणून घ्यावी लागत असल्याचे मत आश्विनी पालयेकर यांनी व्यक्त केली. आपला मुलगा कृष्णा पालयेकर हे सामाजिक कार्य करतात त्यांचा मला अभिमान आहे, माणुसकीचा झरा त्याच्यातही वाहत असल्याचे दिसते, त्याच्या सारख्या मुलाला जन्म देणे म्हणजे आईच्या आईपणाला धन्यता आहे, कला जोपासत असताना कलाच आपल्याला आपल्याकडे वळवत असते, कलेची आवड असली कि सवड नक्की मिळते.

Pernem Corporator Palayekar Painting Ganesh idols at Pernem  Goa
Goa: सुदिन ढवळीकर कडून मगो-भाजप युतीचे संकेत !

आजची मुलं मातीत हात घालत नाही, असे म्हणतात परंतु आमच्या चित्रशाळेत अनेक मुले आवड म्हणून मातीत हात घालून मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करतात, आज काल आई वडील आपल्या मुलांना मातीत हात घालायला देत नसल्याने काही मुले मातीत हात घालायला बघत नाहीत. आई वडिलांनी मुलांची आवड ओळखून मुलांना जर मार्गदर्शन केले तर ती मुले नक्कीच या कलेत प्राविण्य मिळवू शकतात, असेही पालयेकर शेवटी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com