Goa: प्रदूषणमुक्त इलेट्रिक वाहनांचे वितरण  Dainik Gomantak
गोवा

Goa: प्रदूषणमुक्त इलेट्रिक वाहनांचे वितरण

महसूलमंत्र्यांहस्ते उद्‍घाटन, 17 वाहने अधिकाऱ्यांकडे सुपूर्द

दैनिक गोमन्तक

पणजी: महसूल खात्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील अधिकाऱ्यांना कामे वेळेत करण्यासाठी होणारी वाहन अडचण महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी इलेट्रिक व डिझेलवरील मिळून 17 नवीन वाहने देऊन दूर केली. या इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण (Pollution) होणार नाही तसेच लोकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांना अधिक वेळ मिळेल असे मत मोन्सेरात यांनी वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर बोलताना व्यक्त केले. गेल्या कित्येक वर्षापासून उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी वाहनांची अडचण होत होती. त्यामुळे त्यांना कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नव्या वाहनांसाठीचा प्रस्ताव महसूल खात्यामार्फत सरकारकडे पाठवण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिल्याने आज 8 इलेट्रिकल व 9 डिझेल वाहने अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व मामलेदार तसेच उत्तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आल्या. गोव्यातील महसूल कार्यालय खूप चांगले काम करत आहेत आणि नवीन वाहनांसह ते आणखी चांगले काम करतील आणि महसूल विभागाला अधिक उंचीवर नेतील. अशीच आणखी नवीन 13 वाहने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येतील, अशी आशा मंत्री मोन्सेरात यांनी व्यक्त केली.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय म्हणाले की, ही नवीन वाहने अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन देतील आणि अधिक उत्साहाने काम करण्यास नैतिक आधार आणि प्रेरणा देतील. या नवीन वाहनांमुळे वाहनांसाठी यापूर्वी असलेला संघर्ष संपेल असे ते म्हणाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी - १ गोपाळ पार्सेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी - २ श्रीमती मामू हागे(आयएएस) अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, स्नेहा गिते (आयएएस), रविशंकर निप्पणीकर, दीपक वायंगणकर, तिसवाडीचे मामलेदार आणि उत्तर जिल्हा प्रशासनचे इतर अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT