Goa pollution control Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Goa Pollution Control Board inspection: औद्योगिक व किनारी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुविधांची पडताळणी करण्यासाठी तपासणी मोहिमेचे नियोजन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: औद्योगिक व किनारी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच महापालिका व पंचायतींच्या कचरा व्यवस्थापन सुविधांची पडताळणी करण्यासाठी विस्तृत तपासणी मोहिमेचे नियोजन गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी मंगळवारी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मंडळाने घेतलेला हा पहिला मोठा निर्णय मानला जात आहे.

डॉ. मार्टिन्स यांच्या अध्यक्षतेखालील प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे गोव्यातील औद्योगिक क्षेत्र, किनारी भागातील व्यावसायिक उपक्रम आणि पालिका-पंचायतस्तरीय घनकचरा व्यवस्थापनावर बारीक नजर ठेवली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रणासंदर्भात मंडळाने घेतलेले हे तातडीचे पाऊल राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.

हणजूण आणि कोलवा या किनारी पर्यटन भागातील आवाज व वायूप्रदूषणविषयक निगराणीची जबाबदारी साहाय्यक पर्यावरण अभियंता अमित शानभाग, कनिष्ठ पर्यावरण अभियंता सिद्धांत प्रभुदेसाई, वैज्ञानिक साहाय्यक रवी नाईक, साहाय्यक पर्यावरण अभियंता प्रवीण फळदेसाई, वैज्ञानिक साहाय्यक चैतन्य साळगावकर आणि रेश्मा वाझ यांच्यावर सोपविली आहे.

या ठिकाणी ऑनलाईन ध्वनी प्रदूषण पर्यवेक्षण यंत्रणेची प्रत्यक्ष कार्यक्षमता तपासून अहवाल तयार केला जाणार आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत तपासणीसाठी साहाय्यक पर्यावरण अभियंता केशव फडके, कनिष्ठ पर्यावरण अभियंता विश्वेंद्र नाईक आणि वैज्ञानिक अधिकारी नीलेश पार्सेकर यांची नियुक्ती केली आहे.

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील उद्योग तपासणीची जबाबदारी साहाय्यक पर्यावरण अभियंता रोहन नागवेकर, कनिष्ठ पर्यावरण अभियंता कुंदन शेट, वैज्ञानिक (ब) संजय काणकोणकर यांच्यावर सोपविली आहे. या तपासणीत औद्योगिक युनिट्समधील सांडपाणी प्रक्रिया, उत्सर्जन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण साधनांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.

महापालिका व ग्रामपंचायत क्षेत्रे

मुरगाव पालिका, सांकवाळ व चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन तपासणीसाठी कनिष्ठ पर्यावरण अभियंता सिद्धांत देसाई आणि पर्यावरण साहाय्यक सेबेस्त्यांव कुलासो यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. म्हापसा पालिका व पेन्ह द फ्रांका ग्रामपंचायत क्षेत्रासाठी साहाय्यक पर्यावरण अभियंता मनोज कुडाळकर आणि कनिष्ठ पर्यावरण अभियंता राजमोहन प्रभुदेसाई, फोंडा पालिका, कुर्टी-खांडेपार व ताळगाव ग्रामपंचायत तपासणीसाठी कनिष्ठ पर्यावरण अभियंता विजय कानसेकर आणि कनिष्ठ पर्यावरण अभियंता देवेश घोलकर, शिवाय सर्व पालिका तसेच पणजी महापालिका येथील घनकचरा प्रकल्पांचेही निरीक्षण केले जाणार आहे.

विशेष जबाबदाऱ्या

या सर्व तपासण्या पूर्ण करून पर्यावरण अभियंता नंदन प्रभुदेसाई आणि वरिष्ठ पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर यांना २४ सप्टेंबरपर्यंत अहवाल मंडळाला सादर करावा लागणार आहे. तसेच गंभीर गैरप्रकार आढळल्यास जोगळेकर त्वरित कठोर कारवाई करतील, असा आदेश देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: धारगळमध्‍ये होणार यंदाचा ‘आयुर्वेद दिन’

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT